Kidney Infection Symptoms and Reason : हायड्रेट राहणं म्हणजे भरपूर पाणी पिणं शरीराच्या आरोग्यासाठी फार गरजेचं असतं. असं केलं नाही तर शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. शरीरात पाणी कमी झालं तर किडनीला इन्फेक्शन, किडनी स्टोन आणि किडनीसंबंधी इतरही गंभीर समस्या होऊ शकतात. याचंच एक ताजं उदाहरण म्हणजे टीव्ही अभिनेत्री शिवांगी जोशी (Shivangi Joshi) आहे.
शिवांगीने नुकताच किडनी इन्फेक्शनवर उपचार केला. तिने बरी झाल्यानंतर आपल्या फॅन्सना सल्ला दिला आहे की, तुम्ही शरीर, मेंदू आणि आत्म्याची काळजी घेतली पाहिजे. सगळ्या महत्वाचं म्हणजे हायड्रेटेड राहिलं पाहिजे. शिवांगी जोशीला तुम्ही ओळखत असाल तर ती एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. तिने 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत काम केलं आहे. इन्स्टावर तिची फॅन फॉलोईंगही भरपूर आहे. तिने तिच्या इन्स्टावर एक पोस्ट शेअर केली आहे. ती सध्या हॉस्पिटलमध्ये दाखल आहे.
शिवांगीने पोस्टमध्ये सांगितलं की, ती किडनीच्या इन्फेक्शनमुळे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाली होती. फोटोत ती नारळाचं पाणी पिताना दिसत आहे. बरी झाल्यावर तिने फॅन्सचे आभार मानले आणि सगळ्यांना हायड्रेटेड राहण्याचा सल्ला दिला आहे.
सध्या वेगाने वाढत असलेलं तापमान आणि या वातावरणात हायड्रेट राहण्याचा सगळ्यात जास्त धोका आहे. सामान्यपणे या वातावरणात किडनी इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो. उन्हाळ्यात अधिक घाम येत असल्याने शरीरात पाणी कमी होतं, ज्याचा थेट प्रभाव किडनींवर पडतो.
काय असतं हे किडनी इन्फेक्शन?
किडनीमध्ये इन्फेक्शन तेव्हा होतं जेव्हा लघवीच्या मार्गात ई.कोलाई (E.Coli) मुळे बॅक्टेरिअल इन्फेक्शन होतं. बॅक्टेरिया लघवीच्या मार्गातून शरीरात प्रवेश करतात आणि किडनीपर्यंत पोहोचतात. याने इन्फेक्शन होतं.
किडनी इन्फेक्शनची लक्षण?
- हे इन्फेक्शन झालं की, पाठीच्या खालच्या भागात आणि पोटाखाली वेदना होते.
- ओटीपोटाच्या आसपास वेदना आणि अस्वस्थता जाणवते
- इन्फेक्शन झालं तर रूग्णाला ताप येतो
- तापासोबतच थरथरी आणि थंडी वाजते
- खूप जास्त कमजोरी जाणवते
- भूक कमी लागते
- सुस्ती येते
- काही केसेसमध्ये रूग्णांना डायरिया होतो
हायड्रेट राहणं का गरजेचं?
किडनी इन्फेक्शनने पीडित लोकांना सामान्यपणे भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण याने किडनीतून बॅक्टेरिया बाहेर काढण्यास मदत मिळते. त्यांना भरपूर पाणी पिण्याचा सल्ला तोपर्यंत दिला जातो जोपर्यंत त्यांना डार्क रंगाची आणि दुर्गंधी येणारी लघवी येणं बंद होत नाही.
डिहायड्रेशन झाल्यावर का वाढतो धोका?
NCBI च्या एका रिपोर्टनुसार, (Ref) डिहायड्रेशन होणे म्हणजे पाणी कमी पिणे किंवा न पिणे यामुळे तुम्हाला यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) चा धोका होऊ शकतो. इतकंच नाही तर आवश्यक तेवढं पाणी प्यायले नाही तर किडनी डिजीज आणि किडनी फेलिअरचा धोकाही असतो. लघवी करताना वेदना किंवा जळजळ होणे, पुन्हा-पुन्हा लघवी लागणे, लघवी करूनही बरं न वाटणे, लघवीतून रक्त येणे, लघवीतून दुर्गंधी येणे आणि पोटाच्या खालच्या भागात वेदना होणे ही याची लक्षण आहेत.