(Image Credit : healthline.com)
जेव्हा विषय आजारांच्या उपचारांचा येतो तेव्हा असे अनेक पदार्थ आहेत, जे आपल्या औषधी गुणांमुळे आजार दूर करण्यासाठी फायदेशीर मानले जातात. औषधी गुण असलेला असाच पदार्थ म्हणजे मध. सर्दी-खोकला, घशात खवखव, कमजोर इम्यूनिटी या समस्या दूर करण्यासोबतच वजन कमी करण्यासाठी मध फायदेशीर ठरतं. अशात मध आणि कॉफी हे कॉम्बिनेशन वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. चला जाणून घेऊ कसं कॉफीमध्ये मध टाकून सेवन केल्यास वजन कमी होतं. पण हा उपाय करत असताना तज्ज्ञांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे.
वजन घटवण्यासाठी कॉफी
(Image Credit : slashgear.com)
कॅफीनमुळे कॉफी एक एनर्जी ड्रिंकसारखी वापरली जाते. कारण कॉफी डोपामाइनसारखे न्यूरोट्रान्समिटर रिलीज करते. आणि याने आपल्याला ताजतवाणं वाटण्यास मदत होते. पण तुम्हाला हे माहीत नसेल की, कॅफीन फॅट बर्निंग सप्लिमेंटप्रमाणे काम करतं आणि वजन कमी करण्यास उत्तेजित करतं. रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, कॉफी २ प्रकारे वजन कमी करते. एक म्हणजे मेटाबॉलिज्म वाढवून दुसरं म्हणजे फॅट टिशूने फॅटला गतिशील करून.
कसा होईल फायदा?
(Image Credit : littlecoffeeplace.com)
आता तुम्हाला हे कळालं आहेच की, कॉफी आणि मध या दोन्ही गोष्टी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असतात. अशात जेव्हा तुम्ही या दोन्हींचं मिश्रण करता तेव्हा वजन घटवण्याचा वेग वाढतो. याचा शरीरावर जास्त प्रभाव बघायला मिळेल. तुम्हाला हवं तर तुम्ही तुमच्या कॉफीमध्ये १ चमचा मध टाकू शकता.
मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत
अॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असलेल्या मध आणि कॅफीन दोन्ही गोष्टीने शरीरातील मेटाबॉलिज्म वाढण्यास मदत मिळते. मेटाबॉलिज्म मजबूत होणं म्हणजे तुमचं शरीर फॅट बर्न करण्यास चांगल्याप्रकारे काम करेल. याने वजन कमी करण्याची प्रक्रिया वेगाने होईल.
कॅलरी बर्न करण्यास फायदेशीर
मधात अनेकप्रकारचे व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात आणि याचं नियमित सेवन केलं तर याने कॅलरी अधिक प्रमाणात बर्न करण्यास मदत मिळू शकते. त्यासोबतच मध ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यासही मदत करतं. ज्याने शरीरातून फॅट सहजपणे बाहेर निघतं.
(टिप : हा उपाय करण्याआधी एकदा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कारण लोकांना याची अॅलर्जी सुद्धा असू शकते. चुकून साइड इफेक्ट्स होऊ नये म्हणून तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)