शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

तिला व्यसनानं मारलं; पण मशरूमने तारलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 9:18 AM

पहिल्या मुलानंतरच मानसिकदृष्ट्या थोडी हललेली जेसिका दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर तर तिला ‘पोस्ट नेटल ड्रिपेशन’ म्हणजे बाळंतपणानंतरच्या नैराश्याने ग्रासलं होतं.

तुमच्या लेखी मशरूमला किती महत्त्व असेल?- एक पौष्टिक भाजी इतकंच. बरोबर? पण कॅनडातील न्यू ब्रून्सविक शहरात राहणाऱ्या ३४ वर्षांच्या जेसिका गोविनची मात्र गोष्टच वेगळी. ती स्वत:ला ‘क्वीन ऑफ मशरूम’ म्हणते. या मशरूममुळेच आपला जीव वाचला असं ती म्हणते. जेसिका १६ वर्ष एका व्यसनाधीन आयुष्य जगली. दारू, ड्रग्ज घेतल्याशिवाय तिला चैनच पडायची नाही. आपण हे घेतो म्हणूनच जगतो आहोत असा तिचा समज झाला होता.

नोव्हेंबर २०१२मध्ये जेसिकाला दुसरा मुलगा झाला. वर्षभरापूर्वीच तिच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला होता. पहिल्या मुलानंतरच मानसिकदृष्ट्या थोडी हललेली जेसिका दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर तर तिला ‘पोस्ट नेटल ड्रिपेशन’ म्हणजे बाळंतपणानंतरच्या नैराश्याने ग्रासलं होतं. सहा वर्षे ती नैराश्यात परिणामी व्यसनाच्या विळख्यात अडकून पडलेली होती; पण एप्रिल २०१८ मध्ये जेसिका कॅनडातील माँकटन येथील एका जंगलात गेली होती. त्या जंगलात हिंडताना तिला जगण्याचा नवा दृष्टिकोन मिळाला. या जंगलात नैराश्य आणि व्यसनानं सैरभैर झालेली जेसिका शांत झाली. आपल्याला आलेलं नैराश्य घालवण्याचा नैसर्गिक मार्ग ती शोधू लागली. ते शोधण्यासाठी तिला मदत केली ती मशरूमने. गेल्या सहा वर्षांपासून जेसिका सतत चांगल्या, उपयुक्त मशरूमचा शोध घेत असते. मशरूम हाच तिच्या आहाराचा मुख्य घटक आहे. वेगवेगळ्या पदार्थांमध्ये  ती ब्लॅक ट्रम्पेट मशरूमचा मसाल्यासारखा उपयोग करते. सतत निरिक्षणं, अभ्यास याद्वारे जेसिका आता मशरूम विषयातील तज्ज्ञ झाली आहे.  ती लहान मुलांना, तरुणांना,  प्रौढांना अपेक्षित फायदे मिळवण्यासाठी चांगले मशरूम्स कसे ओळखावे, कसे निवडावे याचं प्रशिक्षणही देते.

नवीन आयुष्य देणाऱ्या मशरूमच्या आधारानेच जेसिकाच्या डोक्यावरील कर्ज फिटलं.  मशरूम जेसिकासाठी आहारही आहे आणि औषधही. या मशरूमच्या मदतीनेच जेसिका मानसिक आजारातून पूर्ण बरी झाली. मुलं होण्याआधीपासूनच जेसिकाला तिच्या मित्र-मैत्रिणींमुळे दारू पिण्याचं व्यसन होतं; पण जोडीदार मिळाला, मुलं झाली, जेसिकाच्या कुटुंबाने आकार घेतला तसं जेसिकाचं मानसिक संतुलन बिघडलं. दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर मात्र जेसिकाला खूपच थकवा आणि एकटेपणा जाणवायला लागला. एकीकडे ती मुलांना वाढवत होती आणि दुसरीकडे घरातल्या जबाबदाऱ्या, मुलांना वाढवण्याचा ताण यातून सुटका मिळवण्यासाठी ती व्यसनांमध्ये जास्तच अडकत गेली. दिवसभरातली मुलांसाठीची जास्तीची कामं करून झाल्यावर तिचा पूर्ण वेळ दारू पिण्यात जायचा. दर आठवड्याला मित्र -मैत्रिणींकडून ती ड्रग्जसाठी पैसे उधार घ्यायची. व्यसनासाठी अशी उधार-उसनवारी करता-करता तिच्या डोक्यावरचं कर्ज वाढलं. दारू आणि ड्रग्जशिवाय आपल्याला तरणोपाय नाही, हे जाणवल्यावर मात्र नैराश्याचा, चिंतेचा फास अधिकच घट्ट झाला.

 जेसिकाच्या आयुष्यात जंगल फेरीच्या निमित्ताने मशरूम्स आले आणि जेसिकाचं आयुष्यच बदललं. व्यसनाचा विळखा, मानसिक-भावनिक ताण यातून सुटण्याचा मार्ग तिला निसर्गाच्या सान्निध्यात सापडला. मनातली भीती टप्प्याटप्प्याने कमी होत गेली. एकीकडे जेसिकाचं मशरूम प्रेम वाढत होतं तशी ती दिवस-रात्र मानवाला उपयुक्त मशरूम्स कोणते, ते कसे ओळखावे, कसे मिळवावे, याचा अभ्यास जेसिका करू लागली. हा तिचा अभ्यास आज सहा वर्षांनंतरही सुरूच आहे.जेसिका दररोज तीन तास जंगलात फिरते. स्थानिक, पारंपरिक औषधोपचार, वनस्पतींचे औषधी उपयोग आणि मशरूमची ओळख या विषयांचे जेसिका शिकवणीवर्ग घेते. स्वत:च्या दोन मुलांनाही ती जंगलात घेऊन जाते. जेसिकाच्या या शिकवणीमुळे तिची दोन्ही मुलं १०० पेक्षा जास्त प्रकारचे मशरूम एका नजरेत ओळखू शकतात. जेसिका म्हणते, मी जर व्यसनामधेच बुडून राहिले असते तर नक्कीच मेले असते; मशरूम्समुळेच निसर्गाच्या चमत्काराची अनुभूती घेता आली. निसर्गाच्या जवळ राहिलो, निसर्गामुळेच तर आयुष्य सोपं होतं!’ जेसिका म्हणते, त्यात न पटण्यासारखं काय आहे? 

मानसिक आजारांवर निसर्गाचा उपचार! जेसिका निसर्गाच्या मदतीने स्वत:ला होणाऱ्या त्रासातून बाहेर आली. अर्थात, ही कल्पनी नवीन  नाही. जपानी लोकांचा ‘फाॅरेस्ट बाथिंग’वर विश्वास आहे. भीती, नैराश्य दूर करण्यासाठी रुग्णाला प्रिस्क्रिप्शन म्हणून निसर्गाचा उपचार लिहून देणारे डाॅक्टर जगभरात आहेत. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका कमी करणारे मशरूम त्यातील विशिष्ट घटकांमुळे मानसिक आरोग्यासाठीही उपकारक असतात हे वेगवेगळ्या संशोधनांतून आणि अभ्यासातून सिद्ध झाले आहे.