शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
2
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
3
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
4
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
5
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
6
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
7
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
8
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
9
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
10
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
11
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
12
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
13
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
14
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
15
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
16
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
17
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
18
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
19
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...
20
Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरातून बाहेर, नक्की कारण काय? जाणून घ्या...

अडुळसा वनस्पती आहे बहुगुणी, उपाय असे की तुम्ही कधी विचारही केला नसेल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 8:36 PM

सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारांवर अडुळसा रामबाण इलाज आहे. पण अडुळश्याचे फायदे इतकेच नाहीत. अडुळसा इतर अनेक आजारांवरही गुणकारी आहे.

अडुळसा ही औषधी वनस्पती खूपच गुणकारी आहे. या औषधीमध्ये असे काही गुण आहेत ते मानवी शरीरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारांवर अडुळसा रामबाण इलाज आहे. पण अडुळश्याचे फायदे इतकेच नाहीत. अडुळसा इतर अनेक आजारांवरही गुणकारी आहे. वाचुयात  आयुर्वेदिक डॉक्टर मनीष सिंह यांनी ओन्लीमायहेल्थ या संकेतस्थळाला सांगितलेले अडुळशाचे फायदे.

अडुळसा म्हणजे काय?अडुळसा हे दोन-तीन फूट उंचीचे छोटीसी झुडूप असते. ही वनस्पती सदैव व हिरवीगार असते तिला फुले व टोकाला फळे असतात. या वनस्पतीची लागवड पावसाळ्यात केली जाते.

घशात खवखव, टीबी, ब्रॉँक्राईटीस यांच्यावर उपायअडुळसा कफनाशक आहे. खोकला येत असून ताप येत असेल तर अडुळशाच्या रसाने कमी होतो. सर्दी आणि खोकल्यावर हे औषध अनेक दशकांपासून वापरलं जात आहे. त्याचबरोबर डेंग्य, ब्रॉंक्राईटीस, गळ्यात सुज येणे, डायरिया, हार्टबर्न, अस्थमा या आजारांवर अडुळसा उत्तम उपाय आहे. अडुळशाची ७-८ पानं पाण्यात उकळा आणि नंतर हे पाणी गाळून त्यात मध मिसळून प्या.

विषाणूच्या संसर्गावर उपचारअडुळशाचे अँटीव्हायरल गुणधर्म संसर्गावर उपचार करण्यास सक्षम असतात. अडुळसा शरीराचं तापमान कमी करतं, चोंदलेलं नाक मोकळं करतं. ज्यामुळे श्वास घेण्यास होणारा त्रास कमी होतो आणि आजार बरा होण्याच्या प्रक्रियेस वेग येतो. जर तुम्हाला त्वचेवर बॅक्टेरिअल फंगल इन्फेक्शन असेल तर त्यावर अडुळशाच्या पानांचा लेप लावा

जखम झाल्यास, तोंडात व्रण उमटल्यास करा वापरअडुळशाची पाने बारीक वाटून ती जखमेवर बांधली असता जखम भरून येते. रक्तपित्त म्हणजे नाकातून अथवा तोंडातून रक्त येत असल्यास अडुळसा द्यावा. १० मि. लि. अडुळशाचा रस तितकीच खडीसाखर घालून द्यावा, रक्त पडण्याचे कमी होते.अडुळशाच्या पानांचा डोक्यावर लेप घातला असता नाकातून वाहणारे रक्त बंद होते. तुमच्या तोंडात जर छाले उमटले असतील तर त्यावरही अडुळसा इलाज आहे.

अर्थराईटीस किंवा सांधेदुखीवरसांधेदुखीमुळे दैनंदिन कामांमध्ये व्यत्यय येऊ शकतो. युरिक अॅसिडची शरीरातील वाढलेली पातळी अशा वेदनांना कारणीभूत आहे. अडुळसा युरिक अॅसिडची पातळी कमी करण्यात मदत करत असल्याने वेदना कमी करते. या औषधी वनस्पतीचे सूज विरोधी गुणधर्म सांध्यातील सुजेस कमी करण्यास मदत करतात. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स