अलिकडे दुधापासून ते तांदळापर्यंत कितीतरी गोष्टींमध्ये भेसळ होताना बघायला मिळते. ही इतक्या हुशारीने केली जाती की, सहजासहजी लक्षातही येत नाही. आता तर राजस्थान आणि गुजरातमध्ये नकली जिऱ्याचा धंदा चांगलाच वाढला आहे. दिल्लीत पहिल्यांदाच पकडण्यात आलेल्या नकली जिऱ्याने मोठी चिंता वाढली आहे. हे जिरं जंगली गवत, गूळाचं पाणी आणि दगडांची पावडर मिळून तयार केलं जातं. जे आरोग्यासाठी चांगलंच नुकसानकारक आहे. नकली जिऱ्याच्या सेवनाने केवळ स्टोनचाच नाही तर याचं नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्तीही कमजोर होते. तसेच कॅन्सरचाही धोका होतो.
यावर डॉक्टरांचं मत आहे की, ही भेसळ फार घातक आहे आणि सामान्य लोकांच्या जीवनासोबत खेळणं झालं. हे लगेच थांबवलं पाहिजे. न्यूट्रिशननिस्ट डॉक्टर अनिता लांबा यांनी नवभारत टाइम्सला सांगितले की, ज्याप्रकारे हे जिरं तयार केलं जातंय किंवा त्यात ज्या गोष्टी मिश्रित केल्या जातात त्याने स्टोनचा धोका अधिक आहे.
तसेच याने रोगांसोबत लढण्याची क्षमताही कमी होते. त्या म्हणाल्या की, मनुष्याचं शरीर भेसळयुक्त पदार्थ खाण्यासाठी तयार झालेलं नाही. तसेच एका दुसऱ्या डॉक्टरांनी याबाबत सांगितले की, या जिऱ्याने कॅन्सर होऊ शकतो किंवा त्वचेसंबंधी आजारही होऊ शकतात.
कसं तयार केलं जातं हे जिरं?
यासाठी एक खासप्रकारचं गवत वापरलं जातं. ते गुळाच्या पाण्यात मिश्रित करून सुकवलं जातं. याने गवताना रंग जिऱ्याच्या रंगासारखा होतो. नंतर जिऱ्याला चमक आणि ठोस करण्यासाठी त्यात दगडाची पावडर मिश्रित केली जाते. हे प्रामुख्याने गुजरात आणि राजस्थानमध्ये अनेक महिन्यांपासून सुरू आहे. इथून देशातील इतर भागांमध्ये जिरं पाठवलं जात आहे.
कशी पटवाल ओळख?
नकली जिऱ्याची ओळख पटवण्यासाठी एका वाटीमधे पाणी घ्या. हे जिरं पाण्यात टाकल्यावर काही वेळाने विरघळू लागतं. त्याचा रंग जातो. तेच ओरिजनल जिरं पाण्यात टाकल्यानंतरही विरघळत नाही.