झोप ही प्रत्येकाला खूप प्रिय असते. बदलेली जीवनशैली आणि कामाचा वाढता ताण यामुळे अनेकांची झोप पूर्ण होत नाही. झोप अपूर्ण झाल्यामुळे आपल्या दिवसभराच्या कामावर स्वभावावर परिणाम होतो. अगदी आरोग्याचाही समस्या होतात. अनेकांना झोप न लागण्याची समस्या असते. अशात चांगल्या झोपेसाठी काय करायचं तो विचार केला जातो. अगदी काही लोक तर शांत आणि चांगल्या झोपेसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळी देखील घेतात.
तुम्ही दुपारी झोपल्यावर कधी शिव्या खाल्ला आहेत का? काही लोक म्हणतात की दुपारी झोपल्यावर वजन वाढतं म्हणून अनेक महिला थकल्या असल्या तरी दुपारी झोपत नाही. दुपारची झोप ही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही? दुपारची ती एक डुलकी किती गरजेची आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊयात. (trending news ways to take a nap during the day peacefully sleep tips)
अशी घ्या दुपारची डुलकी1. जर तुम्हाला दुपारी चांगली डुलकी घ्यायची असेल तर सर्वात आधी झोपेची वेळ ठरवा.पुढे रोज दुपारी ठरवलेल्या वेळीच झोपा. जर दुपारी झोपण्याच्या वेळेत वर-खाली झाल्यास व्यक्तीच्या झोपेवरही परिणाम होतो. त्यामुळे ठरलेल्या वेळेच झोपा.
2. शिवाय दुपारी झोपण्यासाठी एकच जागा ठरवा. जर तुम्ही झोपण्याची जागा वारंवार बदलत असाल तर तुम्हाला नीट झोप लागणार नाही.
3. जर तुम्ही घरून काम करत असाल (work from home) तर अशावेळी दुपारी एक डुलकी घ्यायची आहे. तर तुमच्या मोबाईलमधील अलार्म तुम्हाला मदत करेल. दुपारी अर्धा तासाची झोपही अनेक वेळा पुरेशी असते. अनेकांना कामाची चिंता असते अशात दुपारी झोप घेताना आपण जास्त वेळ झोपून राहिलो तर ही चिंता सतावते. म्हणून अशावेळी अलार्म लावून झोपा.
दुपारी झोपण्याचे फायदे1. जर एखादी व्यक्ती दिवसा झोपत असेल तर ती व्यक्ती थकली आहे हे नक्की.2. मानसिक आरोग्यही चांगले राहते.3. व्यक्ती तणावापासून दूर राहते.4. व्यक्तीला ऊर्जा मिळते.5. माणसाला फ्रेश वाटतं.