(Image Credit : Reader's Digest)
वाढदिवसाला अनेकजण गमतीने म्हणतात की, आयुष्यातील एक वर्ष कमी झालं. मित्रही गमतीने 'अरे म्हातारा होतोय तू' अशा कमेंट करू लागतात. अनेकांना असा अनुभव आला असेल. सामान्यपणे आपण बघतो की, वाढत्या वयामुळे अनेकजण निराश होऊ लागतात. कारण वाढत्या वयाकडे लोक म्हातारणाशी जोडून बघतात. त्यामुळे कुणी जर वय विचारलं तर अनेकजण वय लपवण्याचा प्रयत्न करतात. पण मुळात वय वाढणं तुमच्या आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्यासाठीही फार फायदेशीर असतं. तज्ज्ञांनुसार तर याचा संबंध मेंदूच्या क्षमतेशी सुद्धा असतो.
आत्मविश्वास वाढतो
वाढत्या वयासोबतच अनेक गोष्टी इम्प्रूव्ह होतात. त्यातील एक मुख्य गोष्ट म्हणजे आत्मविश्वास वाढणे. अनेकांना कमी वयात वेगवेगळ्या गोष्टी करण्यात अडचणी, भीती वाटत असते, अनेकांना स्टेजवर जाण्याची भीती वाटत होती, तर कुणाला इंटरव्ह्यूचं टेन्शन आलं असेल. पण जसजसं वय वाढत जातं, तुमचा आत्मविश्वास वाढत जातो.
सौंदर्य सुद्धा खुलतं
जसजसं वय वाढत जातं त्याचा सर्वात जास्त प्रभाव त्वचेवर पडतो. वय वाढत असताना त्वचेवरील ऑईल दूर होत जासं आणि त्वचा ड्राय व चांगली होऊ लागते. वयानुसार, सेबेससियस ग्लॅंडमधून ऑइलचा स्त्राव कमी होतो. ज्यामुळे वाढत्या वयासोबत ऑइली त्वचेची समस्याही दूर होते.
स्मरणशक्ती
(Image Credit : independent.co.u)
जास्तीत जास्त लोकांची अशी धारणा असते की, वयानुसार मेंदूची क्षमता कमी होऊ लागते. पण इश्यू ऑफ सायकॉलॉजिकल सायन्सच्या एप्रिल २०१५ च्या रिसर्चनुसार, आपल्या कॉग्नीटिव्ह स्कील, ज्यात नाव, नवीन शब्द, माहिती लक्षात ठेवणे या क्षमता वयानुसार वाढत जाते. अभ्यासकांनुसार, विसरण्याची समस्या साठ वर्षांनंतर सुरू होते. हा रिसर्च ५० हजार लोकांच्या आयक्यू आणि मेमरी टेस्टवर केला होता. ज्यात लहान मुले, तरूण आणि वयोवृद्धांचा समावेश होता.
मायग्रेन होतो दूर
वाढत्या वयासोबत मायग्रेनची समस्या ठीक होऊ लागते. यूनायटेड किंगडमच्या मायग्रेन ट्रस्टच्या मायग्रेन रिसर्च चॅरिटीनुसार, सर्वच केसेसमध्ये असं होत नाही, पण ४० टक्के लोकांचं असं मत आहे की, त्यांच्या वाढत्या वयासोबत त्यांची समस्या दूर झाली.
कमी झोप येणे
वय वाढण्याचा सर्वात मोठा फायदा हा असतो की, तुमच्याकडे काम करण्यासाठी जास्त वेळ असतो. कारण वय वाढण्यासोबत झोप कमी येते. खासकरून एका वयानंतर दिवसा झोप येतंच नाही. ज्यामुळे काम करण्यासाठी तुम्हाला अधिक वेळ मिळतो.