(Image Credit : The Hans India)
ब्रिटीश वैज्ञानिकांनी आर्टिफिशिअल इंटॅलिजन्सपासून एक अशी सिस्टीम तयार केली आहे, ज्याव्दारे अकाली होणाऱ्या मृत्यूची सूचना आधीच मिळेल. ही सिस्टीम मध्यम वयातील तरूणांमध्ये गंभीर आजारामुळे होणाऱ्या प्री मॅच्युअर मृत्यूची माहिती देऊन सतर्क करेल. हे तंत्रज्ञान नॉटिंगघम यूनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी तयार केलं आहे. शोधात ४० ते ३९ वर्षांच्या ५ लाख लोकांना सहभागी करून घेण्यात आलं होतं.
PLOS ONE जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, या आर्टिफिशिअल इंटॅलिजन्सच्या नव्या मॉडलला रेंडम फॉरेस्ट नावाने ओळखलं जातं. याने फार सूक्ष्म माहिती मिळते. याआधी तयार करण्यात आलेल्या अशाप्रकारच्या तंत्रांपेक्षा हे तंत्र अधिक चांगल्याप्रकारे काम करतं. नॉटिंगघम यूनिव्हर्सिटीचे असिस्टंट प्रोफेसर स्टीफन वेंग यांच्यानुसार, मृत्यूचा संकेत किंवा इशारा देणाऱ्या या सिस्टीममध्ये आधी अनेक प्रकारची माहिती विचारली जाते. यात व्यक्तीची भौगोलिक स्थिती, बायोमेट्रिक माहिती, क्लीनिकल आणि लाइफस्टाइलशी निगडीत गोष्टींचा समावेश असते.
सध्या कॉक्स रिग्रेशन नावाचं एक असंच मॉडेल आहे, जे वय आणि लिंग या आधारावर माहिती देतं. वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की, केवळ एक-दोन गोष्टींच्या आधारावरच शारीरिक धोक्याची खोलवर माहिती दिली जाऊ शकत नाही.
प्रोफेसर वेंग यांच्यानुसार, यामुळे सावधानी बाळगून गंभीर आजारांसोबत लढलं जाऊ शकतं. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही अशा सिस्टीमवर काम करत आहोत. जेणेकरून लोकांना कॉम्प्युटरच्या मदतीने आरोग्याच्या धोक्यांबाबत माहिती देऊ शकू.
अभ्यासक जो केई यांच्यांनुसार, अशाप्रकाचं तंत्र हे हेल्थ रिसर्चमध्ये नवीन आहे. पण यांचं तंतोतंत पालन करणं कठीण आहे. मात्र, एआयच्या मदतीने आरोग्याची काळजी घेणे फायदेशीर ठरू शकतं.