एड्सचा विळखा आणि तरुणाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2016 2:53 PM
नुकताच १ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय एड्स निर्मुलन दिन साजरा करण्यात आला. एड्सची पायबंदी व्हावी यासाठी भारत सरकारकडूनही मोठ्या प्रमाणात विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.
-Ravindra Moreनुकताच १ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय एड्स निर्मुलन दिन साजरा करण्यात आला. एड्सची पायबंदी व्हावी यासाठी भारत सरकारकडूनही मोठ्या प्रमाणात विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. मात्र एवढे करूनही जागतिक आरोग्य संघटना व संयुक्त राष्ट्र यांच्या अहवालानुसार एड्सचा विळखा दिवसेंदिवस वाढतच आहे. एड्सच्या विळख्यात आतापर्यंत संपूर्ण जगात ३ कोटी ३४ लाख महिला, पुरुष अडकले असल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे देशाचे भविष्य समजले जाणारे तरूण यात मोठ्या संख्येने ओढले गेले आहेत. या महाभयंकर आजाराने आतापर्यंत जगातील अडीच कोटी नागरिकांवर मृत्यू ओढावला गेला आहे. नव्या संशोधनानुसार प्रतीदिनी साडे सात हजार एड्सचे नवीन रूग्ण समोर येत असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विशेषत: एड्स संक्रमणास ३० ते ३५ टक्के युवापिढीच जबाबदार असून, भविष्यात संक्रमणाचे प्रमाण वाढू नये म्हणून यासंदर्भात तरुणाईने अधिक सजग राहणे अत्यावश्यक आहे. एड्सचा प्रसार कसा होतो यासंदर्भात भारतातील ८० ते ९० टक्के जनतेला माहिती आहे. मात्र, त्यापासून बचावाच्या उपाय योजनेचे व्यवहारिक ज्ञान त्यांना नाही. असुरक्षित यौन संबंध हेच एचआयव्ही संक्रमणामागील सर्वात मोठे कारण आहे. त्याच्या खालोखाल देह विक्री करणाºया महिला, समलिंगी संबंध, मादक द्रव्यांचे सेवन तसेच एचआयव्ही बाधित मातांकडून होणाऱ्या बालकाला एड्सचा प्रसार झालेला असतो. भारतातील तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, नागालँड व मणिपूर या सहा राज्यात एचआयव्हीचा सगळ्यात जास्त प्रसार झाला आहे. तर सर्वाधिक एड्स रुग्णांच्या संख्येच्या संदर्भात दक्षिण आफ्रिका व नायजेरिया या देशानंतर भारताचा क्रमांक लागतो. अर्थात भारत तिसºया क्रमांकावर आहे. तरुणाईला आवाहनएड्सचे समूळ निर्मुलन करण्यासाठी आजच्या तरुणाईने पुढाकार घेऊन विविध माध्यमांतून एड्स जनजागृती मोहिमेची व्यापक प्रसिद्धी करून तालुकास्तरावर रॅली, अर्ध मॅरेथॉन, आॅर्केस्ट्रा यांचे आयोजन करावे. इतर राज्यांतून ट्रक, बस व इतर वाहनांतून येणारे प्रवासी, महामार्गावरील ढाबे, हॉटेल या ठिकाणी फलक, प्रदर्शनांद्वारे तसेच कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे जनजागृती करावी. युवा वर्गाच्या माध्यमातून याचा प्रचार व्हावा व समाजप्रबोधन व्हावे. युवकांनी नुसता प्रचारच न करता स्वत:ही तेवढीच काळजी घेणे गरजेचे आहे. ‘कुछ नहीं होता है...’ या प्रवृत्तीमुळे आज तरुण वर्ग या विळख्यात अडकत चालला आहे. तरुणाईचा स्वैराचार ऐन तारुण्यात मनात विचारांचे थैमान माजलेले असते. त्यातच ‘कुछ नही होता है...’अशा स्वैराचारी विचारांना बळी पडून एचआयव्ही या जीवघेण्या आजाराच्या विळख्यात सर्वाधिक तरुण अडकत असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञ आणि समुपदेशकांचा अनुमान आहे. बºयाचदा या तारुण्यात प्रेमप्रकरणातील आलेली जवळीकताही जीवघेणी ठरते. एका अहवालानुसार तारुण्यातील या स्वैराचारामुळे जिल्हा कार्यालयात रोजच्या होणाºया नवीन नोंदणीत नवविवाहितांची संख्या ३० ते ४० टक्के आहे. हे टाळायचे असेल, तर लग्नापूर्वी प्रत्येकाने आपली एचआयव्ही तपासणी करून प्रत्येकाने याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना सखोल ज्ञानाची गरजआज फक्त महाविद्यालयातीलच विद्यार्थ्यांना एड्सबाबत जनजागृती केली जाते, मात्र टीव्ही आणि इंटरनेटच्या माध्यमातून मिळणारी लैंगिक माहिती आणि इतर चंगळवादी सामाजिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक परिणामांमुळे शालेय मुला-मुलींमध्ये लैंगिक संबंधांबाबत येत चाललेली मोकळीक, हा पालक- शिक्षकांच्या चिंतेचा विषय आहे. याबाबतीच्या नैतिक मुद्यांवर चर्चा तसेच एचआयव्ही- एड्सच्या धोक्यासंदर्भात विशेषत: शालेय मुलांमध्ये एड्सची कारणे, त्याचे परिणाम याबाबत विद्यार्थ्यांना सखोल ज्ञानाची गरज आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. टॅटूमुळेही एचआयव्ही... सध्या फॅशनेबल दिसण्यासाठी सर्वत्र टॅटूची क्रेझ वाढत चालली आहे. मात्र हे नवीन फॅड जिवावर बेतू शकते, याची जाणीव तरुणांना करुन देणे गरजेचे आहे. टॅटू काढताना जी सुई वापरली जाते ती नवीन आहे का? की आधीच्याच व्यक्तीची आहे, हे तपासून घेण्याचे कष्ट सहसा कोणी घेत नाही. ही जी त्वचेखालील डर्मिस पातळीला स्पर्श करते, तेव्हा जर टॅटू काढून घेणारी व्यक्ती एचआयव्ही बाधित असेल, तर त्यानंतर त्याच सुईने टॅटू काढून घेणाºयास एचआयव्हीची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे तरुणांनी याबाबत जागरूक राहावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.