नवी दिल्ली – ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स भारत बायोटेकची नेजल व्हॅक्सिन(Nasal Vaccine) BBV154 चं लवकरच चाचणी घेण्यात येणार आहे. ही चाचणी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात होणार. जगभरात बहुतांश देशात कोरोनाची नाकाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या कोरोना लसीवर सध्या रिसर्च सुरू आहे. तर भारतात Bharat Biotech ची नेजल व्हॅक्सिनला ऑगस्टमध्ये दुसऱ्या टप्प्यातील क्लीनिकल चाचणीला मंजुरी मिळाली होती.
एएनआयच्या वृत्तानुसार सूत्रांनी माहिती दिलीय की, एम्समध्ये नेजल व्हॅक्सिन चाचणी पुढील काही आठवड्यात सुरू होणार आहे. चाचणीच्या परवानगीसाठी एम्सच्या एथिक्स कमेटीकडे अर्ज सादर करण्यात आला आहे. भारत बायोटेकच्या या व्हॅक्सिनचे ट्रायल प्रमुख इन्वेस्टिगेटर डॉ. संजय राय हे असतील. एथिक्स कमेटीच्या मंजुरी मिळाल्यानंतर स्वयंसेवकांवर या नेजल व्हॅक्सिनचे दोन डोस चार आठवड्यांच्या कालावधीत दिले जातील. म्हणजे कोरोनाचा नेजल लसीचा पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस देण्यात येईल असं सांगण्यात आले आहे.
कोरोनाची नेजल स्प्रे व्हॅक्सिन
कोरोना व्हायरस नियंत्रणात आणण्यासाठी सध्या लसीकरण मोहिमेवर भर दिला आहे. कोरोनाची नेजल व्हॅक्सिन ही इंजेक्शनद्वारे देणाऱ्या लसीपासून सुटका होणार आहे. भारतासह अनेक देश कोरोनाची लस बनवण्यात यशस्वी झाले आहेत. भारतात भारत बायोटेकला नेजल स्प्रे लसीची चाचणी करण्याची परवानगी मिळाली आहे. सध्या इंफ्लूएंजा आणि नेजल फ्ल्यूची नेजल व्हॅक्सिन बाजारात उपलब्ध आहे. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, चीन या देशात नेजल व्हॅक्सिनवर चाचणी सुरू आहे.
नेजल व्हॅक्सिनचे ५ फायदे
इंजेक्शनद्वारे मिळणाऱ्या लसीपासून सुटका
नाकाच्या आतील बाजूस अँन्टिबॉडी तयार झाल्यामुळे श्वासाद्वारे संक्रमण होण्याचा धोका कमी
कमी धोका असल्याने लहान मुलांसाठीही लसीकरण करणं सोप्पं
इंजेक्शनपासून सुटका होत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्याची आवश्यकता नाही
उत्पादन सुलभ असल्याने जगभरातील मागणी आणि पुरवठानुसार व्हॅक्सिन उपलब्ध करून देणं शक्य
भारतातील पहिली नेजल व्हॅक्सिन
ही भारतातील पहिली BBV154 नेजल व्हॅक्सिन आहे. ज्याची देशात मानवी चाचणी केली जाणार आहे. पहिली चाचणी १८ ते ६० वयोगटातील स्वंयसेवकांवर करण्यात आली होती. ही यशस्वी झाली. दुसऱ्या टप्प्यातील निकालानंतर तिसऱ्या टप्प्यातील चाचणी होईल. एम्समध्ये सध्या २ ते १८ वयोगटातील लहान मुलांवर कोव्हॅक्सिनची यशस्वी चाचणी झाली आहे.
नेजल स्प्रे व्हॅक्सिन कसं काम करते?
नेजल स्प्रे व्हॅक्सिन इंजेक्शनऐवजी नाकाद्वारे दिलं जातं. ही नाकाच्या आतील बाजूस इम्युन तयार करतं. त्यामुळे ही जास्त प्रभावी मानले जाते कारण कोरोनासह हवेत पसरणाऱ्या अधिक संक्रमित आजार हे नाकाच्या माध्यमातूनच शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे नाकाच्या आतील भागात इम्युनिटी तयार झाल्यास आजार रोखण्यासाठी जास्त प्रभावी सिद्ध ठरू शकेल.