ALERT : आपणही अल्कोहोलसोबत एनर्जी ड्रिंक्स मिक्स करीत असाल तर व्हा सावध !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2017 12:36 PM
जर आपणही संपूर्ण आठवड्याचा थकवा अल्कोहोलचे सेवन करुन घालवत असाल तर वेळीच सतर्क व्हायला हवे.
बहुतेक यंगस्टर्स आॅफिसमधील व्यस्तता आणि संपूर्ण आठवडा काम केल्यानंतर आलेला थकवा घालविण्यासाठी सुटीच्या दिवशी मौज-मस्ती करतात. मौज-मस्ती म्हणजेच अल्कोहोलिक पार्टी होय. जर आपणही संपूर्ण आठवड्याचा थकवा अल्कोहोलचे सेवन करुन घालवत असाल तर वेळीच सतर्क व्हायला हवे. बऱ्याचजणांना अल्कोहोलसोबत एनर्जी ड्रिंक्स मिक्स करुन सेवन करण्याची सवय असते. मात्र ही सवय आपल्या आरोग्यासाठी किती घातक ठरु शकते हे आपणास कदाचित माहित नसेल. नुकत्याच झालेल्या एका संशोधनुसार, कॅफिनेटेड एनर्जी ड्रिंक्ससोबत मद्य मिक्स करून सेवन केल्याने लोकांचे खाली पडून इजा होण्याचा धोका जास्त वाढतो. कॅनडामध्ये संशोधकाच्या एका टीमने १३ लोकांवर एक अभ्यास केला. या अभ्यासादरम्यान करण्यात आलेल्या विश्लेषणात असे आढळले की, ज्या लोकांनी मद्य सेवन करताना एनर्जी ड्रिंक्स मिक्स केले होते त्यांना कोणत्याना कोणत्या प्रकारच्या जखमा झाल्या होत्या. १३ लोकांवर झालेल्या या संशोधनात त्यापैकी १० लोक असे होते ज्यांना एकतर स्वत:हून जखम झाली होती किंवा एखाद्या कारच्या अपघातात ते जखमी झाले होते. सोबतच जे लोक वरील दोन्ही श्रेणीत येत नाहीत त्यांनी एक तर विनाकारण इतर लोकांशी वाद केला होता आणि कुठल्यातरी शारीरिक हिंसेत त्यांचा सहभाग होता. Also Read : Health : हॅँगओवर झालाय? वापरा ‘हे’ आरोग्यदायी घरगुती उपाय !