ALERT : पुरुषांनी ‘या’ ७ टेस्ट कराव्याच !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2017 12:25 PM
आपणास आयुष्यभर सुदृढ आणि निरोगी राहायचे असेल तर प्रत्येक पुरुषाने या ७ टेस्ट आवर्जून कराव्याच.
-Ravindra Moreजर योग्यवेळी आजाराचे निदान झाले तर त्यावर योग्य उपचार होऊन संभाव्य धोक्यापासून वाचले जाऊ शकते. जर आपणास आयुष्यभर सुदृढ आणि निरोगी राहायचे असेल तर प्रत्येक पुरुषाने या ७ टेस्ट आवर्जून कराव्याच.१. प्रोस्टेट कॅन्सर स्किन कॅन्सरनंतर पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर होणे ही सामान्य बाब आहे. जर योग्यवेळी निदान झाले तर या जीवघेण्या आजारापासून वाचले जाऊ शकते. या आजाराचे निदान करण्यासाठी डिजिटल रेक्टम टेस्ट आणि प्रोस्टेट स्पेसिफिक एंटीजन ब्लड टेस्ट अशा दोन प्रकारच्या टेस्ट केल्या जातात.२.टेस्टीकुलर कॅन्सर या कॅन्सरने पुरूषांचा रिप्रोटेक्टिव्ह ग्लॅँड प्रभावित होतो. या आजाराच्या विळख्यात २० ते ५४ वयोगटाचे पुरुष येतात. यामुळे जेव्हाही आपण रुटीन चेकअप करण्यासाठी जाल तेव्हा टेस्टीकुलर टेस्ट करणे विसरु नका. ३. हाय ब्लड प्रेशर जसे वय वाढते तसे हाय ब्लड प्रेशरचा धोकाही वाढतो. हा आजार लठ्ठपणा आणि लाइफस्टाइलशी निगडित आहे. याने आपल्या ह्रदयाला मोठा धोका असतो यासाठी वेळोवेळी आपल्या ब्लड प्रेशरची टेस्ट करुन घ्यावी. ४. कोलेस्ट्रॉल लेवलशरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्याने ह्रदयाच्या समस्या निर्माण होतात. यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकदेखील येऊ शकतो. ब्लड टेस्टने आपल्या शरीरात असलेले धोकेदायक कोलेस्ट्रॉलचा तपास लागू शकतो. ५. डायबिटीजहा आजार आपल्या सोबत अनेक आजारांना आणतो. जसे स्ट्रोक, किडनीशी संबंधीत समस्या, आंधळेपणा, नर्व डॅमेज आणि नपुसंकता. जर योग्यवेळी डायबिटीजचे निदान केले तर सर्व आजारांपासून वाचले जाऊ शकते. याचे निदान करण्यासाठी ब्लड शुगर टेस्ट, ग्लुकोज टॉलरेंस टेस्ट आणि ‘ए1सी’ टेस्ट केली जाते. ४५ वर्ष वयानंतर दर तीन महिन्यांनी या टेस्ट आवर्जून कराव्यात.६. एच.आय.व्ही. टेस्टएच.आय.व्ही.चे निदान ब्लड टेस्टने केले जाऊ शकते. यात सर्वात पहिली टेस्ट ‘एलिझा’ किंवा ‘इआयए’ असते. कित्येकदा या टेस्टने एच.आय.व्ही. व्हायरसचे निदान होत नाही. यासाठी अधिक स्पष्ट निदानासाठी वेस्टरेन ब्लॉस्ट एसे नावाची दुसरी टेस्ट केली जाते. ७. ग्लूकोमाहा आजारा डोळ्यांच्या नसांना प्रभावित करतो ज्याने आपण अंध होऊ शकतो. हा आजार कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो. यासाठी ४० पेक्षा कमी वयाच्या लोकांना दर दोन वर्षात एकदा, ४० ते ६४ वयोगटातील पुरुषांना वर्षातून एकदा आणि ६५ वर्षावरील लोकांना दर सहा महिन्यांनी एकदा ही टेस्ट करावीच.