ALERT : टॉयलेटमध्ये स्मार्टफोन वापरताय, सावधान !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2017 10:44 AM
टॉयलेटमध्ये स्मार्टफोन घेऊन जाणे आरोग्यासाठी किती हानिकारक आहे, हे आपणास माहिती आहे का?
-Ravindra Moreअगोदर लोक टॉयलेटमध्ये जाताना आपल्या सोबत न्यूजपेपर किंवा मॅग्झीन घेऊन जात असत, आता मात्र ट्रेंड बदलला आहे. सध्या लोक टॉयलेटमध्ये स्मार्टफोन घेऊन जातात. ते आपल्या फोनपासून एक मिनिटही लांब राहू शकत नाही. टॉयलेटमध्ये स्मार्टफोन घेऊन जाणे आरोग्यासाठी किती हानिकारक आहे, हे आपणास माहिती आहे का?बाथरुममध्ये सर्वात जास्त जिवाणू असतात जे फोनवर चिपकतात. यामुळे संक्रमणाचा धोका निर्माण होतो. लोकं फक्त हा विचार करतात की, आपण फक्त फोनला टच करतोय, तर अशाने त्यावर टॉयलेटचे जिवाणू कसे येऊ शकतात? जेव्हा आपण फ्लश करता तेव्हा पाणी दूरवर पसरते, ज्यामुळे पाण्याचे बरेच थेंब फोनवरदेखील पडतात आणि हेच आपल्या लक्षात येत नाही. यामुळेच संक्रमण पसरते. याशिवाय जेव्हा आपण टॉयलेट करतेवेळी फ्लशला हात लावतात, त्यानंतर तर आपण फोनचा टच करतोच ना. याने फ्लशवरचे जिवाणू आपल्या हाताद्वारे फोनवर चिकटतात. बाथरुमच्या प्रत्येक वस्तूवर जिवाणू बसलेले असतात. यासाठी जेव्हा आपण त्या वस्तूंचा वापर केल्यानंतर आपला फोनचा टच करतात तेव्हा ते जिवाणू आपल्या फोनलाच आपले घर बनवितात. एका अभ्यासानुसार फोनच्या गरमीमुळे हे जिवाणू आकर्षित होतात यासाठी ते तिथेच चिटकून राहतात जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. घराच्या बाथरुमपेक्षा सर्वात खराब सार्वजनिक बाथरुम असतो. म्हणून तिथे आपला फोन वापरणे टाळाच.