नवी दिल्ली - भारत बायोटेक तयार करत असलेली स्वदेशी लस कोव्हॅक्सीनकडे सध्या संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. कोव्हॅक्सिनच्या फेज-2 क्लिनिकल ट्रायल्सचे परिणाम जारी करण्यात आले आहेत. यानुसार ही लस किमान 12 महिन्यांपर्यंत व्यक्तीला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यस सक्षम असल्याचे आढळून आले आहे.
महत्वाचे म्हणजे, ही लस सर्व वयोगटातील स्त्री-पुरुषांवर सारखीच परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. सध्या या लशीचे तिसऱ्या टप्प्यावरील ट्रायल सुरू आहे. विशेष म्हणजे कंपनीने आपल्या लशीसाठी ड्रग रेग्यूलेटरकडे इमरजन्सी अप्रूव्हलचीही मागणी केली आहे.
माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, एस्ट्राजेनेका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची लस कोव्हिशिल्डला डिसेंबर अखेरपर्यंत इमरजन्सी अप्रूव्हल मिळू शकते. यासाठी ड्रग रेग्युलेटरच्या सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने ज्या डेटाची मागणी केली होती, तो डेटा, भारतात लशीचे ट्रायल करत असलेल्या सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने (SII) जमा केला आहे. सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने भारत बायोटेककडेही त्यांच्या लशीसाठी देशभरात सुरू असलेल्या फेज-3 ट्रायलच्या सुरुवातीच्या परिणामांचा डेटा मागवला आहे.
यातच, भारत बायोटेकने बुधवारी कोव्हॅक्सिन अर्थात BBV152 च्या फेज-2चे परिणाम घोषित केले आहेत. यात दीर्घकाळ शरीरामध्ये चांगल्या प्रकारे अँटीबॉडी आणि T-सेल मेमरी रिस्पॉन्स दाखवला आहे. फेज-1च्या स्वयंसेवकांत व्हॅक्सिनेशनचा दुसरा डोस देण्याच्या तीन महिन्यानंतरही लस परिणामकारक दिसून आली आहे. तर, फेज-2 ट्रायलमध्ये लशीने वाढलेला ह्युमरल आणि सेल-मिडियेटेड इम्यून रिस्पॉन्स दर्शवला आहे.
...म्हणून इमरजन्सी अप्रूव्हलला लागतोय उशीर -भारत बायोटेकने डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात कोव्हॅक्सिनसाठी इमरजन्सी अप्रूव्हलची मागणी केली होती. यासंदर्भात ड्रग रेग्युलेटरच्या सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीची एक बैठकही झाली आहे. यावेळी कमिटीने सेफ्टी आणि एफिकेसीशी संबंधित अतिरिक्त डेटा जमा करण्यात यावा. तेव्हाच इमरजन्सी यूज अप्रूव्हल (EUA) दिले जाऊ शकेल, असे भारत बायोटेकला सांगितले होते. म्हणजेच इमरजन्सी यूज अप्रूव्हलसाठी कंपनीला देशात सुरू असलेल्या फेज-3 क्लिनिकल ट्रायल्सचा सेफ्टी आणि एफिकेसी डेटा जमा करावा लागणार आहे.