Corona Virus Kent Variant : व्हायरसच्या विश्वात मोठा बदल होत आहे. कोरोना व्हायरस आता त्याच्याच एका दुसऱ्या रूपाला सत्ता सोपण्याच्या तयारीत आहे. यूनायटेड किंगडमच्या (United Kingdom) केंटमधून समोर आलेल्या कोविड-१९(Covid -19) च्या नव्या रूपाने एक्सपर्टही हैराण आहेत. यूके जेनेटिक सर्व्हिलांस प्रोग्रामच्या हेड शॅरान पीकॉक यांनी बीबीसीला सांगितले की, व्हायरसचा केंट व्हेरिएंट(Kent Varient) जगभरात पसरणार याची पूर्ण शक्यता आहे.
दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेतून(South Africa) व्हायरसचं आणखी एक रूप वॅक्सीन(Cororna Vaccine) आणि इम्युनिटीला(Immunitya) मात देत कहर करत आहे. कोविड व्हायरसच्या तिसऱ्या रूपाने ब्राझीलमध्ये(Brazil) पुन्हा वादळ उठवलं आहे. इथे केसेस वाढत आहे. असं मानलं जात होतं की, ब्राझीलमध्ये गेल्यावर्षी उन्हाळ्यात हर्ड इम्युनिटी(Herd Immunity) मिळवली गेली होती. चला जाणून घेऊ कोरोनाच्या या नव्या रूपांबाबत...
म्यूटेशन्स, व्हेरिएंट्स आणि स्ट्रेनमधील फरक
२०१९ मध्ये पहिल्यांदा समोर आलेल्या कोविड-१९ व्हायरसने आतापर्यंत अनेक रूपे बदलली आहेत. सध्या D614G व्हेरिएंट जगभरात पसरत आहे.
म्यूटेशन - एखाद्या व्हायरसच्या जेनेटिक सीक्वेंसमधील बदलाला म्यूटेशन म्हणतात. ही एक सामान्य बाब आहे. कोरोना व्हायरसच्या स्पाइक प्रोटीनमध्येच कमीत कमी ४ हजार म्यूटेशन्स रेकॉर्ड झाले आहेत. म्यूटेशन्स तेव्हा होतं जेव्हा व्हायरस एखाद्या रूग्नाच्या आत आपली कॉपी तयार करतात.
व्हेरिएंट - व्हेरिएंट तो व्हायरस आहे ज्याचा जेनेटिक सीक्वेंस आपल्या मूळ व्हायरसपेक्षा वेगळा असतो.
स्ट्रेन - हा तो व्हेरिएंट असतो ज्यात खूप सारे म्यूटेशन्स होतात आणि यामुळे त्यांचा व्यवहार बदलत जातो.
केंट व्हेरिएंट B1.1.7 आहे सुपरस्प्रेडर
हा व्हेरिएंट गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये इंग्लंडच्या केंटमध्ये डिटेक्ट करण्यात आला होता. याता १७ म्यूटेशन्स झाले आणि त्यामुळे याला सुरूवातीपासूनच मोठा धोका मानला जातो. नोव्हेंबर २०२० नंतर हा जंगलात आगीसारखा पसरणं सुरू झालं आणि आता हा जगात सर्वात कॉमन व्हेरिएंट होण्याकडे वाटचाल करत आहे. हा व्हेरिएंट सुपरस्प्रेडर आहे आणि जे म्यूटेशन यासाठी जबाबदार आहे तो दोन आणखी व्हेरिएंटसोबत मिळालेला आहे. वैज्ञानिकांच्या अंदाजानुसार, म्यूटेशनमुळे हा आधीच्या D614G व्हेरिएंटपेक्षा ५० टक्के जास्त संक्रामक आहे. केंट व्हेरिएंट आतापर्यंत कमीत कमी ५० देशात आढळून आला आहे.
याने रूग्णांमध्ये मृत्यूचा धोका ३० टक्क्यांनी वाढतो. म्हणजे जर आधीच्या व्हायरसने ५० पेक्षा जास्त वयाच्या १ हजार रूग्णांपैकी १० जणांचा जीव घेतला होता. तर हा व्हेरिएंट १३ जणांचा जीव घेऊ शकतो. आतापर्यंत याला वॅक्सीनने मात दिली जात होती. पण याच महिन्यात याचं आणखी एक म्यूटेशन E484K मिळालं आहे.
साउथ आफ्रिकेतील व्हेरिएंट B1.351
हा व्हेरिएंट गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये समोर आला होता. याच्या स्पाइक प्रोटीनमध्येच १० पेक्षा जास्त म्यूटेशन्स झाले आहेत. आजच्या तारखेत दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या ८० टक्के इन्फेक्शन्स याचीच देण आहेत. आणि हा कमीत कमी ३२ देशांमध्ये पसरला आहे. हा केंट व्हेरिएंटसारखाच संक्रामक आहे. पण यात एक E484K म्यूटेशनही आहे. जे फार घातक आहे. या म्यूटेशनमुळे हा व्हायरस आधीच्या इन्फेक्शनमुळे झालेल्या इम्युनिटीला बेकार करतो. आणि वॅक्सीनचा प्रभावही कमी करतो.
ब्राझीलमधील व्हेरिएंट B.1.1.248
ब्राझीलमध्ये दोन व्हेरिएंट आहेत ज्यांना P1 आणि P2 म्हटलं जातं. यातील P1 जो B.1.1.248 सुद्धा आहे. तोच टेंशन देत आहे. हा गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये डिटेक्स केला गेला होता आणि यात ३ म्यूटेशन्स झाले ज्यात E484K चाही समावेश आहे.