भारतात सीझनल इन्फ्लूएंझाचा उपप्रकार H3N2 चे प्रकरणे वेगाने वाढत आहेत. सीझनल व्हायरसच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता, केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना त्यास सामोरे जाण्यासाठी तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनानंतर आता इन्फ्लूएंझा व्हायरस H3N2 ने कहर केला आहे. खरं तर या व्हायरसला इतकं घाबरण्याची गरज नाही. पण सावध राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
इन्फ्लूएंझा H3N2 व्हायरसमध्ये व्यक्तीमध्ये सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी अशी लक्षणे दिसतात. तुमच्या शरीरात अशी लक्षणे आढळल्यास ताबडतोब रुग्णालयात जा आणि डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या. या इन्फ्लूएंझा व्हायरसमध्ये उलट्या आणि जुलाबाची काही लक्षणेही दिसतात.
इन्फ्लूएंझा व्हायरस देखील कोरोना व्हायरसप्रमाणे पसरतो. यामध्ये, कणांच्या संसर्गाच्या प्रसारामुळे किंवा एखाद्याला या व्हायरसची लागण झाली असेल, तर त्याच्या संपर्कात येऊन तो पसरतो. इन्फ्लूएंझा व्हायरस प्रसार रोखण्यासाठी सतर्क राहण्याची गरज असल्याचे तज्ञांनी सांगितले.
'असा' करा बचाव
जर एखाद्याला या व्हायरससारखा त्रास होत असेल तर त्याने त्वरित डॉक्टरांना भेटावे. याशिवाय गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याची गरज आहे. आपले हात स्वच्छ ठेवा आणि आपल्या तोंडाला आणि नाकाला वारंवार हात लावू नका. या व्हायरसमध्ये तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्याची गरज आहे. रोज गरम पाणी प्या. तसेच फळे आणि भाज्या मुबलक प्रमाणात खा असा सल्ला दिला जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"