थंडीत केस गळती ही सामान्य समस्या आहे. यासाठी अनेक घरगुती उपाय केले जातात. आज्जी त्यानंतर आई हे नेहमी आपल्याला घरगुती नुस्के सांगत असतात. त्यातच एक उपाय म्हणजे कोरफडीचा. कोरफडीचा गर केसांना लावल्याने केसांमधील कोंडा निघून जातो. कोरफडीचे नेमके फायदे आणि गुणधर्म लक्षात घेतले पाहिजे.
कोरफडीमुळे केस आणि त्वचा दोन्ही निरोगी राहते. कोरफडीत औषधी गुणधर्म अधिक आहेत जे केसांना मजबूत करतात. तर कोरड्या त्वचेवर कोरफड अतिशय गुणकारी आहे. काही जण कोरफडीचा ज्यूसही पितात. त्याची चव कडू असल्याने सगळेच तो पितील असे नाही. कोरफडीचा मास्क चेहऱ्याला लावल्याने चेहरा तजेलदार होतो.
मेकअप काढण्यासाठी
आजकाल मेकअप केल्याशिवाय कोणी बाहेरच पडत नाही. मेकअप योग्यरित्या काढला नाही तर चेहरा खराब होतो. कोरफडीचा वापर मेकअप रिमुव्हर म्हणून करता येऊ शकतो. यामुळे नैसर्गिक पद्धतीने मेकअप काढला जाईल आणि काही साईड इफेक्टही होणार नाहीत. यामुळे त्वचा स्वच्छ आणि तजेलदार दिसते.
टोनर
अनेकांची त्वचा फारच तेलकट असल्याने ते त्रस्त असतात. चेहरा सतत तेलकट दिसतो. यासाठी टोनरचा वापर होतो. त्वचा एकसारखीच दिसावी म्हणजेच टोन करावी यासाठी टोनर वापरले जाते. तर टोनर म्हणून तुम्ही कोरफडीचा वापर करु शकता.
क्लींजर
चेहऱ्यावर पिंपल म्हणजे मुलींसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न. कोरफडीचा गर पिंपलवर रामबाण उपाय आहे. चेहरा क्लीन करण्यासाठी, मृत त्वचा घलवण्यासाठी कोरफड वापरली जाते. अगदी डॉक्टरांनीही कोरफडीच्या फायद्यांना दुजोरा दिला आहे.