शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
2
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?
3
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
4
१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
5
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
6
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
7
IRCTC कडून ७ दिवसांची जपान टूर पॅकेज; कायकाय पाहायला मिळणार? किती असणार शुल्क?
8
'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीला दाऊदपासून आहे मुलगा? दिल्लीच्या माजी कमिश्नर यांनी केलेला धक्कादायक खुलासा
9
BSNL चा धमाकेदार प्लान, ९०० रुपयांपेक्षा कमीत मिळतेय ६ महिन्यांची वैधता; बेनिफिट्सही आहेत खास
10
अवघं २ किलो वजन, १ हजार डिग्री तापमान, चीनने तयार केला अणुबॉम्बपेक्षा शक्तिशाली बॉम्ब, भारतासाठी धोक्याचा इशारा
11
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
12
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
13
I Killed Monster ! माजी DGP ची हत्या करून पत्नीनं मित्राला व्हिडिओ कॉल केला अन्...
14
सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?
15
भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, सौदीहून परतलेल्या पतीला संपवलं; मृतदेह बॅगेत भरला अन्...
16
'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज
17
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
18
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
19
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा

लिंबाच्या सालीचे काय असतात फायदे? वाचाल तर कधीच फेकणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 10:27 IST

Lemon peel benefits : लिंबाच्या सालीमध्ये अनेक पोषक तत्व असतात. ज्याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Lemon peel benefits : लिंबू पाणी, लिंबू याचं सेवन लोक वेगवेगळ्या पद्धतीने करतात. सामान्य जास्तीत जास्त लोक लिंबाच्या रसाचा वापर करून लिंबाची साल फेकून देतात. कारण त्यांना लिंबाच्या सालीचे फायदेच माहीत नसतात. लिंबाच्या सालीमध्ये अनेक पोषक तत्व असतात. ज्याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

लिंबूच्या सालीतील पोषक तत्व

लिंबूच्या सालीमध्ये कॅल्शीयम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि फायबर यांचे उच्च गुणधर्म असतात. म्हणूच आज आम्ही तुम्हाला लिंबूच्या सालिबद्धलचे औषधी गुणधर्म सांगणार आहोत. जे तुमच्या सांधेदुखीवर फायदेशीर ठरू शकेल.

लिंबाच्या सालीचा कसा कराल वापर?

औषधी म्हणून वापर करण्यासाठी लिंबूची साल काढताना लक्षात ठेवा की, लिंबूची केवळ पिवळी सालच काढा. आतला गर नको. या सालीचा लेप तयार करून शरीरावर ज्या ठिकाणी वेदना होतात अशा ठिकाणी लावा. हा लेप लावल्यावर त्या ठिकाणी एका कापडाने हलकेसे बांधून ठेवा. जेणेकरून लेप हलणार नाही आणि खाली पडणार नाही. दोन तासानंतर हा लेप काढून टाका.

कसा बनवाल हा लेप?

एका काचेच्या भांड्या लिंबूच्या काढलेल्या साली घ्या. यात 3 ते 4 चमचे ऑलिन्ह ऑईल मिसळून काचेचे भांडे झाकनाने बंद करा. 15 दिवस या साली तेलात मुरल्यावर त्या तेलाने अवयवांना मालीश करा. काही काळ हे तेल शरीरावर तसेच ठेवा. थोड्या वेळाने पाण्याने अवयव स्वच्छ धुवून काढा.

हाडे होतात मजबूत

लिंबूच्या सालीमध्ये व्हिटॅमीन सी आणि कॅल्शियम अधिक प्रमाणात असते. लिंबूची साल शरीरातील हाडे मजबूत होण्यासाठी लाभदायी असतात. आपल्याकडे लिंबूचे लोणचेही बनवले जाते. लिंबाची साल आर्थराइटिस आणि ऑस्टियोपोरोसिसवर गुणकारी असते.

लिंबाच्या सालीचे इतर फायदे

वजन कमी करण्यास मदत

लिंबाच्या सालीमध्ये पेक्टिन नावाचं तत्व असतं. पेक्टिन शरीराचं वजन कमी करण्यात महत्वाची भूमिका निभावतं. लठ्ठपणा कमी करण्यासाठी तुम्ही लिंबाच्या सालीचा चहा सेवन करू शकता.

कोलेस्ट्रॉल होईल कमी

कोलेस्ट्रॉलच्या रूग्णांसाठी लिंबाची साल फार फायदेशीर ठरते. लिंबाच्या सालीचा हे लोक सेवन करू शकतात. लिंबाच्या सालीमध्ये आढळणाऱ्या पेक्टिनमधील हाइपोकोलेस्टेरोलेमिक प्रभाव कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं.

त्वचेसाठी फायदेशीर

लिंबाच्या सालीमध्ये पॉलीफेनोल्स आढळतात. ज्यात अ‍ॅंटी-एजिंग आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट गुण आढळतात. त्याशिवाय यात व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी सुद्धा असतं. जे त्वचेसाठी फायदेशीर असतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य