Amla honey benefits : आवळा एक असं फळ आहे ज्याचं हिवाळ्यात आवर्जून सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. कारण यात व्हिटॅमिन सी आणि आयर्नचं प्रमाण भरपूर असतं. याच्या सेवनाने शरीराचा इन्फेक्शन आणि वायरल आजारांपासून बचाव होतो. आवळ्याने शरीराची इम्यूनिटी बूस्ट होते. अशात जर तुम्हाला आवळ्याचे जास्त फायदे मिळवायचे असतील तर आवळा आणि मध एकत्र खाण्याचा सल्ला दिला जातो. आवळा आणि मध एकत्र खाल्ल्याने आरोग्याला ५ मोठे फायदे मिळतात. चला जाणून घेऊ काय...
आवळा आणि मध खाण्याचे फायदे
- बरेच लोक हिवाळ्यात मध आणि आवळ्याचं सेवन करतात. यातील अॅंटी-फंगल गुणांमुळे आरोग्यासंबंधी अनेक दूर करण्यास मदत मिळते. सोबतच केसही मजबूत होतात.
- अस्थमाच्या रूग्णांनी त्यांच्या आहारात आवळ्याचा समावेश करायला हवा. यातील गुणांमुळे ही समस्या कमी करण्यास मदत मिळते. यात अॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात, जे फुप्फुसातील विषारी तत्व बाहेर काढतात.
- तसेच आवळ्यामध्ये असेही काही तत्व असतात जे कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतात. ज्यामुळे हृदयासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यास मदत मिळते.
- त्वचेची चमक वाढवण्यासाठी आवळा आणि मधातील गुण मदत करतात. याने चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि फाइन लाईन कमी होतात.
कसं कराल सेवन?
5 आवळे घेऊन त्यांचे तुकडे करा. आता त्यात एक मोठा चमचा मध टाकून आवळे मुरू द्या. रोज रिकाम्या पोटी किंवा जेवणाच्या एक तासआधी आवळ्याच्या एक दोन तुकड्याचं सेवन करा. तुम्ही आवळा आणि मधाचं हे मिश्रण १० ते १५ दिवस स्टोर करून ठेवू शकता.