शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
3
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
4
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
5
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
6
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
7
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
8
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
9
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
10
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
11
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
12
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
13
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
15
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
16
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
17
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
18
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
20
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

वेगाने कमी होणार लठ्ठपणा, शुगर लेव्हलही कंट्रोल; मका खाण्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 5:06 PM

मक्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन्स असतात. अशा परिस्थितीत याच्या सेवनाने आरोग्याला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळतात. मका आरोग्यासाठी किती आणि कसा फायदेशीर आहे? लठ्ठपणा कमी होतो का? याबाबत जाणून घेऊया...

निरोगी राहण्यासाठी शरीरात व्हिटॅमिन्स आणि पोषक तत्वं असणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी लोक अनेक गोष्टींचे सेवन करतात, परंतु यासाठी कॉर्न म्हणजे मका खाणं हे अधिक फायदेशीर ठरू शकतं. मक्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन्स असतात. अशा परिस्थितीत याच्या सेवनाने आरोग्याला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळतात. मकाआरोग्यासाठी किती आणि कसा फायदेशीर आहे? लठ्ठपणा कमी होतो का? याबाबत जाणून घेऊया...

डाइटिशियन शीतल गिरी यांनी न्यूज १८ हिंदीला याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मका हा पौष्टिक घटकांनी युक्त आहे. यामध्ये कार्ब्स, प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी1, व्हिटॅमिन बी9, मॅग्नेशियम, पोटॅशियम यासह अनेक पोषक घटक असतात. याशिवाय यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्सही आढळतात. हे आरोग्य चांगले ठेवतात आणि पचनासाठी खूप फायदेशीर ठरतात.

डोळे निरोगी ठेवतात

तज्ज्ञांच्या मते, डोळे निरोगी ठेवण्यासाठी मका खा. वास्तविक मक्यामध्ये ल्युटीन मुबलक प्रमाणात आढळतं, ज्यामुळे दृष्टी चांगली ठेवता येते.

पचनक्रिया सुधारते

मक्याचे सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत होते. मका फायबरसाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे. अशा स्थितीत याच्या सेवनाने ब्लोटिंग, गॅस आणि अपचन यापासून आराम मिळतो. 

शुगर लेव्हल कंट्रोल

आहारतज्ज्ञांच्या मते, मका शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. त्याचा आहारात समावेश केल्यास मधुमेहावर नियंत्रण ठेवता येतं. यामध्ये असलेले घटक मधुमेह नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहेत. 

लठ्ठपणा होतो कमी

मक्यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते, जे पचनासाठी अत्यंत फायदेशीर असतं. अशा स्थितीत याच्या सेवनाने वजन कमी होते. तसेच हे खाल्ल्याने पोट जास्त काळ भरलेलं जाणवतं.  

टॅग्स :Maizeमकाfoodअन्नHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स