नारळाचा वापर भारतीय संस्कृतीमध्ये पूजेसाठी केला जातो. नारळाला श्रीफळाच्या नावानेही ओळखले जाते. वेगवेगळ्या पदार्थांची चव सुधारण्यासाठीही ओल्या खोबऱ्याचा वापर केला जातो. नारळामध्ये व्हिटॅमिन, पोटॅशिअम, फायबर, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात.
ओलं खोबरं खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते, तसेच पोटही साफ होतं. उन्हाळ्यात खोबरं आवर्जून खायला हवं. यानेही तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. चला जाणून घेऊया ओलं खोबरं खाण्याचे फायदे...
1) स्मरणशक्ती वाढते
खोबरं खाल्लाने स्मरणशक्ती वाढते. यासाठी खोबऱ्याच्या पेस्टमध्ये बदाम मिश्रित करुन रोज खावे. नारळात कोलेस्ट्रॉल अधिक प्रमाणात मिळतात जे तुमचं आरोग्य चांगलं ठेवतं.
2) पोट राहतं साफ
जर तुमचं पोट खराब झालं असेल तर ओल्या खाबऱ्याचा एक मोठा तुकडा खाऊन झोपा. सकाळी तुमचं पोट साफ होणार. यात फायबर अधिक प्रमाणात असल्याने यामुळे पोट साफ होतं.
3) नाकातून रक्त येणे होते बंद
उन्हाळ्यात अनेकांना नाकातून रक्त येण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागतं. यावर नारळ हा फारच चांगला उपाय आहे.
4) ओमोटींगपासून आराम
उन्हाळ्यात ओमोटींगची समस्या अनेकांना भेडसावते. वाढतं तापमान आणि घाम यामुळे असे होते. तुम्हाला जर ओमोटींग झाल्यासारखे वाटत असेल तर खोबऱ्याचा एक तुकडा खावा, याने तुम्हाला आराम मिळेल.
5) रोगप्रतिकारशक्ती वाढते
खोबऱ्याच्या सेवनाने इम्यून सिस्टम मजबूत होतं. यात अॅंटी बॅक्टेरिअल, अॅंटी फंगल आणि अॅंटी व्हायरल तत्व असतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.