शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

आल्याचं पाणी पिण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत नसतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 12:23 PM

आले हे गरम असतं त्यामुळे थंडीच्या दिवसात आपल्या डाएटमध्ये याचा समावेश केल्यास फायदा होऊ शकतो. आल्यामध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल, अॅंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात.

आले हे गरम असतं त्यामुळे थंडीच्या दिवसात आपल्या डाएटमध्ये याचा समावेश केल्यास फायदा होऊ शकतो. आल्यामध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल, अॅंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जर तुम्हाला सतत सर्दी-खोकला किंवा सूज येण्याची समस्या होत असेल तर आल्याचं पाणी पिणे फायद्याचं ठरु शकतं. आल्याचं पाणी सकाळी रिकाम्यापोटी प्यायल्यास तुम्हाला दिवसभरासाठी एनर्दी मिळते. चला जाणून घेऊ आल्याच्या पाण्याच्या आरोग्याला होणारे फायदे...

पचनक्रिया सुधारते

पचनक्रिया मजबूत करण्यासाठी आल्याचं पाणी पिणे फायदेशीर ठरु शकतं. यासाठी आले रात्रभर पाण्यात ठेवा. सकाळी हे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. उलटी येणे किंवा मळमळ होणे अशा समस्याही यामुळे दूर होतात. त्यासोबतच हे पाणी प्यायल्याने तुम्हाला सकाळी फ्रेशही वाटेल.

वजन कमी करण्यास मदत

आल्याचं पाणी तुम्हाला वजन कमी करण्यासही फायदेशीर ठरु शकतं. इतकंच नाही तर याने तुमची ब्लड शुगरही नियंत्रित राहते, याने डायबिटीजचा धोकाही कमी होतो. आल्याचं पाणी प्यायल्याने भूक कमी लागते त्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते. 

त्वचा आणि केस चांगले राखण्यासाठी

आल्याच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात अॅटीऑक्सिडेंट तत्व असतात. त्यामुळे याचं सेवन केल्याने शरीराला योग्य प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि सी मिळतात. याने केसाची आणि त्वचेची सुंदरता अधिक वाढण्यास मदत होते. 

मांसपेशींना आराम

एक्सरसाईज केल्यानंतर अनेकांना मसल्समध्ये वेदना होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. आल्याचं पाणी प्यायल्याने मसल्सना आराम मिळते आणि वेदना दूर होतात. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स