बदलत्या ऋतुनुसार शरीराची वेगवेगळी दुखणी उद्भवणं तशी सामान्य गोष्ट आहे. म्हणून याकडे दुर्लक्ष करू नये. ऋतू बदलताच सर्दी-खोकला, ताप आणि शारीरिक वेदनांचा त्रास होऊ लागतो. या समस्यांपासून सुटका व्हावी, असे वाटत असल्यास गुळ आणि जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करा. गुळ आणि जिऱ्याचे पाणी हे शारीरिक समस्यांवर गुणकारी आणि रामबाण असा उपाय असल्याचं म्हटले गेले आहे. आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्यानंतर तुम्ही थेट डॉक्टरांकडे जाता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही औषधांचे सेवन करता. या औषधांमुळे तुमच्या प्रकृतीवर दुष्परिणामदेखील होण्याची शक्यता असते. आरोग्याला कोणताही अपाय होऊ नये,यासाठी कधीकधी घरगुती उपाय करणदेखील फायदेशीर ठरते. यामुळे शरीरावर कोणताही दुष्परिणाम होण्याचा धोका नसतो. गुळामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते. तर गुळ आणि जिऱ्याच्या पाण्याचे सेवन केल्यानंतर शारीरिक वेदनांपासून मुक्तता मिळते.
1. अॅनिमिया -
गूळ आणि जिऱ्याच्या सेवनामुळे शारीरिक वेदना कमी होण्यास मदत होते. सोबत शरीरातील रक्ताची कमतरता आणि अॅनिमियाच्या समस्येतूनही सुटका होते.
2. गॅस -
गूळ आणि जिऱ्याचे पाणी प्यायल्यास पचनक्रियेसंबंधीच्या आजारांपासून मुक्तता मिळते. उदाहरणार्थ, गॅस, पोटदुखी, अपचन यांसारखे त्रास कमी होतात.
3. रोगप्रतिकारक शक्ती -
जिरे आणि गुळाचे पाणी प्यायल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. शरीरातील विषारी पदार्थदेखील बाहेर फेकले जातात.
4.मासिक पाळी -
गूळ आणि जिऱ्याचे पाणी पिणे महिलांसाठी अधिक फायदेशीर ठरते. यामुळे महिलांची मासिक पाळीतील अनियमितता, यासंबंधी आजारांच्या समस्या कमी होतात.
5. ताप आणि डोकेदुखी -
डोकेदुखी, ताप आणि सर्दी खोकल्याचा त्रासदेखील गुळ-जिऱ्यामुळे कमी होतो.