मुंबई : उन्हाळा आला की, सर्वांची मजा असते ती सगळं काही विसरुन आंबे खाण्याची. संधी मिळेल तेव्हा आंब्यावर ताव मारला जातो. या दिवसात वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याचा मनसोक्त आनंद लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच घेत असतात. आंब्याचा गोडवाच असा आहे की, आंबा त्याच्या गोडव्यामुळे आणि आरोग्यदायी फायद्यांमुळे फळांचा राजा मानला जातो.
आंब्यात व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम, कॉपर, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, जिंक सेलेनियम आणि फॉस्फरस सारखे मिनरल्सही असतात. आंब्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. त्यासोबतच त्वचेच्या अनेक समस्याही आंब्यामुळे दूर होतात. चला जाणून घेऊया आंब्याचे आरोग्यदायक फायदे.
1) वजन कमी करणे
तुम्ही खाण्याचे शौकीन असाल आणि वाढलेल्या वजनामुळे हैराण झालेले असाल तर तुम्ही आवर्जून आंबा खायला हवा. यातील पोषक तत्वांमुळे आणि फायबरमुळे शरीरातील अतिरीक्त चरबी नष्ट होते. याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होते.
(बटाट्याच्या रसाचे हे आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क)
2) कॅन्सरपासून सुटका
आंब्यात मोठ्या प्रमाणात अॅटीऑक्सीडेंट्स असतात. यामुळे आंबा खाल्ल्याने तुम्हाला कोलोन कॅन्सरपासून सुटका मिळण्यास मदत मिळते.
3) कोलेस्ट्रॉल कमी करतो
आंब्यात भरपूर प्रमाणात फायबर असतात. आंब्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यास मदत मिळते. सोबतच हृदयाशी निगडीत अनेक रोगांपासूनही सुटका होते.
(डार्क चॉकलेट खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे)
4) स्कीनवर ग्लो
आंबा हा अॅंटी एजिंगसारखं काम करतो. यात वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स असतात, जे चेहऱ्यावर ग्लो आणण्यास मदत मिळते.
5) लैंगिक जीवनात सुख
आंबा खाल्ल्याने तुमचं सेक्स लाईफ चांगलं होतं. आंब्यात व्हिटॅमिन ई असतं जे सेक्स लाईफसाठी चांगलं असतं.
6) स्मरणशक्ती वाढते
आंब्यात व्हिटॅमिन बी मोठ्या प्रमाणात असतं. जे तुमच्या मेंदुच्या विकासासाठी गरजेच असतं. जर तुम्हाला तुमची स्मरणशक्ती वाढवायची असेल तर नियमीत आंब्याचं सेवन केलं पाहिजे.
(उन्हाळ्यात मिळणा-या करवंदाचे औषधी गुण माहीत आहेत का?)
7) डोळ्यांची दृष्टी
आंब्यामध्ये अधिक प्रमाणात व्हिटॅमिन ए असतं, जे डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी फायद्याचं आहे.
8) रक्त वाढतं
आंब्यामध्ये आयर्न असतं. तुमच्या डाएटमध्ये आंब्याचा समावेश केल्यास तुमच्यातील आयर्नची कमतरता भरून निघेल. यामुळे तुमच्या शरीरातील रक्त वाढतं.