नारळाचं पाणी हे आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. नारळाचं पाणी प्यायल्याने हृदय चांगलं राहतं, किडनी चांगली राहते, वजन कमी होतं, त्वचेचा रंग सुधारतो आणि डायबिटीससारखा आजारही कंट्रोलमध्ये राहतो. नारळाचं पाणी हे पोषक तत्वांचं पावर हाऊस आहे. ज्यात पोटॅशिअम, लॉरिक अॅसिड, मॅग्नेशिअम आणि झिंक भरपूर असतं.
लाइफस्टाईल एक्सपर्ट डॉ. बिमल झांजेर यांच्यानुसार, नारळाचं पाणी पूर्ण शरीरासाठी फायदेशीर असतं. यात कॅलरी फार कमी असतात. यात 95 टक्के पाणी असतं. ज्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात.
फॅट फ्री नारळाचं पाणी हृदय निरोगी ठेवतं आणि वजन कमी होण्यास मदत मिळते. चला एक्सपर्टकडून जाणून घेऊ 5 दिवस नारळाचं पाणी प्यायल्याने शरीराला कोणकोणते फायदे मिळतात आणि कोणत्या आजारांपासून बचाव होतो.
हृदयरोगांपासून बचाव
नारळाच्या पाण्यात फॅट असतं, पण त्यातील पाणी फॅट फ्री असतं. नारळाचं पाणी प्यायल्याने हृदयरोगांपासून बचाव होतो. हृदयरोगाच्या रूग्णांनीही नारळ पाण्याचं सेवन करावं याने हृदय फीट राहतं. नारळ पाण्यात 95 टक्के पाणी असतं आणि कोलेस्ट्रॉल अजिबात नसतं. नारळाच्या पाण्यात पोटॅशिअम भरपूर असतं, जे कोलेस्ट्रॉलला कंट्रोल करतं.
'डिहायड्रेशन' करेल कंट्रोल
रोज नारळ पाण्याचं सेवन केल्याने शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून निघते आणि शरीर हायड्रेट राहतं. उन्हाळ्यात याने फार फायदा मिळतो.
किडनी स्टोनपासून बचाव
किडनी स्टोनपासून बचाव करण्यासाठी नारळाचं पाणी फार फायदेशीर ठरतं. नारळाचं पाणी शरीराला हायड्रेट ठेवतं आणि किडनीही निरोगी ठेवतं. एक कप नारळ पाण्यात 600 मिली ग्रॅम पोटॅशिअम असतं. ज्यामुळे किडनी हेल्दी राहते आणि किडनी स्टोनपासूनही बचाव होतो.
केसांना पोषक तत्व देतं नारळ पाणी
अॅंटी-ऑक्सिडेंट, लॉरिक अॅसिड, बी व्हिटॅमिन आणि मॅग्नेशिअम असलेलं नारळ पाणी केसांना पोषण देतं. याचं सेवन केल्याने डोक्याची त्वचा चांगली राहते.
डायबिटीसही राहतं कंट्रोल
नारळाचं पाणी प्यायल्याने डायबिटीस कंट्रोल राहतो. शुगरच्या रूग्णांनी नारळाच्या पाण्याचं सेवन केलं तर शरीर हायड्रेट राहतं. शरीरातील पोषक तत्वांची कमतरता याने पूर्ण होते.
लठ्ठपणा कमी होतो
नारळ पाण्याचं सेवन केल्याने लठ्ठपणा कंट्रोलमध्ये राहतो. याचं सेवन केल्याने पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. भूकही कंट्रोल राहते. वजन कमी करण्यासाठी या पाण्याचं सेवन करणं फार उपयोगी आहे.