Healthy Juice : सध्या उन्हाचा पारा इतका वाढत आहे की, गरमीमुळे लोक हैराण झाले आहेत. दुपारी तर इतकं उकडतं की, लोकांना आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. अनेकांना उष्माघातही होतो. अशात या दिवसांमध्ये उन्ह लागण्यापासून बचाव करायचा असेल आणि शरीर थंड ठेवायचं असेल तर खाण्या-पिण्याची खूप काळजी घ्यावी लागते. असंच एक पेय आहे जे या दिवसात शरीर थंड ठेवतं आणि तुमचा उन्हापासून बचाव करतं. हे खास पेय म्हणजे बेलाचा रस. बेलाच्या ज्यूसचे शरीराला अनेक फायदे मिळतात. सकाळी जर रिकाम्या पोटी तुम्ही बेलाच्या ज्यूसचं सेवन कराल तर याने अनेक फायदे मिळतात. अशात या ज्यूसचे फायदे आज आम्ही सांगणार आहोत.
बेलाचा ज्यूस पिण्याचे फायदे
- बेलाच्या ज्यूसने शरीर थंड राहतं आणि या ज्यूसच्या सेवनाने उष्माघातापासूनही बचाव होतो. हे सरबत शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं.
- या ज्यूसमध्ये फायबर भरपूर असल्याने बद्धकोष्ठतेपासूनही आराम मिळतो. हे ज्यूस नॅचरल लॅक्सेटिवसारखं काम करतं. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या असलेले लोक या ज्यूसचं सेवन करू शकतात.
- बेलाच्या ज्यूसमध्ये हेल्दी कॅलरी असतात ज्या वजन कमी करण्यास मदत करतात. याचं सेवन केल्याने पोट जास्त वेळ भरलेलं राहतं ज्यामुळे पुन्हा पुन्हा भूक लागत नाही.
- मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यासाठी बेलाचं ज्यूस सेवन करू शकता. फायबर भरपूर असल्याने या ज्यूसमुळे पचनही चांगलं होतं. ज्यामुळे गट हेल्थ चांगली राहते.
- बेलाच्या ज्यूसमध्ये अॅंटी-इंफ्लेमेटरी गुण असतात जे त्वचेसाठी फायदेशीर असतात. यामुळे त्वचेसंबंधी समस्या कमी होतात.
- बेलाच्या ज्यूसमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. ज्यामुळे वेगवेगळ्या आजारांपासून आणि इन्फेक्शनपासून तुमचा बचाव होतो.
- बेलामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट गुण असतात. अॅंटी-ऑक्सिडेंट्स शरीराला नुकसान पोहोचवणाऱ्या फ्री रॅडिकल्सना दूर करतात आणि ऑक्सीडेटिव स्ट्रेस कमी करतात.
ज्यूस कसा कराल तयार?
बेलाचा ज्यूस बनवण्यासाठी एक बेळ फळ घ्या, थोडी साखर, अर्धा चमचा जिरे पावडर, एक चतुर्थांश चमचा काळं मीठ, पुदीन्याची काही पाने आणि एक लीटर पाणी घ्या. सगळ्यात आधी बेळ फळ सोलून त्याचा गर काढा. हा गर पाण्यात टाकून उकडून घ्या. इतर सगळ्या गोष्टी त्यात टाका. 10 ते 15 मिनिटे हे उकडू द्या. ज्यूस थंड होऊ द्या आणि नंतर याचं थोडं थोडं सेवन करा.