Garlic Tea Benefits : लसणाने वेगवेगळ्या पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. लसणामध्ये अनेक औषधी गुण असतात. ज्यामुळे आयुर्वेदात याचा फार पूर्वीपासून वेगवेगळ्या उपचारांसाठी वापर केला जातो. लोक वेगवेगळ्या पद्धतीने लसणाचं सेवन करतात. काही लोक कच्चा लसूण खातात तर काही लोक भाजून खातात. मात्र, अनेकांना अजूनही लसणाच्या चहाचे फायदे माहीत नाहीत.
हिवाळ्यात लसणाचा चहा अधिक फायदेशीर मानला जातो. हिवाळ्यात वातावरण बदलामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते. ज्यामुळे वेगवेगळ्या आजारांचा धोका असतो. अशात लसणाच्या चहाने तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकता. इतकंच नाही तर या खास चहाने पचन तंत्रही व्यवस्थित काम करतं. काही लोकांसाठी तर लसणाचा चहा अधिक फायदेशीर ठरतो. चला तर जाणून घेऊ लसणाच्या चहाचे फायदे...
लसणाचा चहा पिण्याचे फायदे
१) इम्यूनिटी वाढते
बदलत्या वातावरणात आपली इम्यूनिटी कमजोर होते, ज्यामुळे लोक वायरल इन्फेक्शनचे शिकार होतात. इम्यूनिटी बूस्ट करण्यासाठी तुम्ही लसणाचा चहा घेऊ शकता. यातील अॅंटी-बॅक्टेरिअल, अॅंटी-फंगल आणि अॅंटी-वायरल गुण अनेक आजारांपासून शरीराचा बचाव करतात.
२) पचनक्रिया सुधारते
अनेकांना वेगवेगळ्या कारणांनी पोट साफ न होण्याची समस्या होते. तसेच पचनासंबंधी समस्याही होतात. अशात नियमितपणे लसणाच्या चहाचं सेवन केलं तर बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि पचनक्रियाही सुधारते.
३) वजन कमी होतं
लसणाचा चहा वेगवेगळ्या आजारांपासून तर वाचवतोच, सोबतच याने वजन कमी करण्यासही मदत मिळते. कारण या चहाने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि फॅट बर्नची प्रक्रिया वेगाने होते.
कसा बनवाल लसणाचा चहा?
लसणाचा चहा बनवण्यासाठी लसणाच्या काही कळ्या सोलून बारीक करा. नंतर एका भांड्यात पाणी उकडा. उकडत्या पाण्यात बारीक केलेल्या लसणाच्या कळ्या टाका आणि १० ते १५ मिनिटे उकडू द्या. टेस्टसाठी यात मध, लिंबाचा रस आणि आलेही टाकू शकता. काही वेळाने गॅस बंद करा आणि कपात चहा टाकून सेवन करा. हा चहा थोडा थंड झाल्यावरच सेवन करा.