Ginger Water : आल्याचा चहा हिवाळ्यात अनेकांना आवडतो. कारण आलं शरीराला गरम ठेवतं. तसेच याचे आरोग्याला अनेक फायदेही असतात. आल्यामधील अॅंटी-बॅक्टेरिअल, अॅंटी-इंफ्लेमेटरी तत्व तुम्हाला निरोगी ठेवतात. सर्दी-खोकला किंवा सूज येण्याची समस्या असेल लोक आल्याचा वापर करतात. अनेकांना हे माहीत नसेल पण आल्याचं पाणी प्यायल्याने तुमच्या अनेक समस्या दूर होतात. आल्याचं पाणी सकाळी रिकाम्यापोटी प्यायल्यास तुम्हाला दिवसभरासाठी एनर्जी मिळते. चला जाणून घेऊ आल्याच्या पाण्याच्या आरोग्याला होणारे फायदे...
पचनक्रिया सुधारते
पचनक्रिया मजबूत करण्यासाठी आल्याचं पाणी पिणे फायदेशीर ठरु शकतं. यासाठी आले रात्रभर पाण्यात ठेवा. सकाळी हे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. उलटी येणे किंवा मळमळ होणे अशा समस्याही यामुळे दूर होतात. त्यासोबतच हे पाणी प्यायल्याने तुम्हाला सकाळी फ्रेशही वाटेल.
वजन कमी करण्यास मदत
आल्याचं पाणी तुम्हाला वजन कमी करण्यासही फायदेशीर ठरु शकतं. इतकंच नाही तर याने तुमची ब्लड शुगरही नियंत्रित राहते, याने डायबिटीजचा धोकाही कमी होतो. आल्याचं पाणी प्यायल्याने भूक कमी लागते त्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते.
त्वचा आणि केस चांगले राहतात
आल्याच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात अॅंटीऑक्सिडेंट तत्व असतात. त्यामुळे याचं सेवन केल्याने शरीराला योग्य प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि सी मिळतात. याने केसाची आणि त्वचेची सुंदरता अधिक वाढण्यास मदत होते.
मांसपेशींना आराम
एक्सरसाईज केल्यानंतर अनेकांना मसल्समध्ये वेदना होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. आल्याचं पाणी प्यायल्याने मसल्सना आराम मिळते आणि वेदना दूर होतात.
कसं कराल तयार?
आल्याच्या या पाण्यात ना साखर असते ना चहा पावडर. दोन कप पाणी एका भांड्यात टाका त्यात एक तुकडा आले टाका. काही वेळ उकडू द्या. हे पाणी कोमट झाल्यावर त्याचं सेवन करा. टेस्ट वाढवण्यासाठी यात तुम्ही काही थेंड लिंबाचा रस टाकू शकता.