शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियानं गुगलला ठोठावला असा दंड की तुम्हीही चक्रावून जाल, एवढा पैसा संपूर्ण पृथ्वीवरही नाही! काय आहे प्रकरण? 
2
LAC वर साडेचार वर्षांनंतर Happy Diwali, भारत आजपासून गस्त घालणार, मिठाई वाटली जाणार
3
"तुमच्या सैनिकांचे मृतदेह पोत्यात भरून पाठवू"; अमेरिकेचा उत्तर कोरियाला थेट इशारा! काय घडलं?
4
विराट पुन्हा होणार RCBचा कर्णधार, बंगळुरूचा संघ 'या' ६ खेळाडूंना रिटेन करणार असल्याची चर्चा
5
"सलमान खान लॉरेंस बिश्नोईपेक्षाही वाईट!", सोमी अली म्हणाली - त्याने ऐश्वर्याचे हाड मोडले होते...
6
मुंबईत उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेना ‘काँटे की टक्कर’, ११ मतदारसंघांमध्ये थेट सामना, उमेदवारांचा कस लागणार
7
काव्या मारन यांची तगडी शॉपिंग! सलामीवीरांना दुप्पट पगार वाढ; क्लासेनला दिलं २३ कोटींचं पॅकेज
8
Stock Market Updates: दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Cipla मध्ये मोठी तेजी
9
आजचे राशीभविष्य, ३१ ऑक्टोबर २०२४: आर्थिक लाभ संभवतात, कौटुंबिक वातावरण आनंदी असेल!
10
Muhurat Trading: दिवाळीत होतं मुहूर्त ट्रेडिंग, शेअर बाजारासाठी खास आहे त्याचा इतिहास; जाणून घ्या
11
शिंदे - अजित पवारांना संपविण्याची भाजपची खेळी, मविआमध्ये वाद नाहीत - रमेश चेन्नीथला 
12
Google Pay, PhonePe आणि Paytm युझर्स लक्ष द्या, १ नोव्हेंबरपासून UPI पेमेंटमध्ये होणार २ बदल
13
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
14
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
15
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
16
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
17
शरद पवार हे घरे फोडण्याचे जनक : देवेंद्र फडणवीस
18
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
19
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
20
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 

हिवाळ्यात ब्रोकलीची भाजी खाण्याचे जबरदस्त फायदे, जे तुम्हालाही नसतील माहीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 1:34 PM

Broccoli in winter : ब्रोकली ही तशी फ्लॉवरची एख प्रजाती आहे. पण यात आढळणारे पोषक तत्त्व फार खास असतात.

हिवाळा सुरू झाला की, वेगवेगळ्या पौष्टिक भाज्या बाजारात मिळतात. थंडीत मिळणाऱ्या सगळ्यात पौष्टिक भाज्यांपैकी एक ब्रोकली आहे. ज्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. ब्रोकलीचा डेली डाएटमध्ये समावेश का करावा, यासाठी thehealthsite.com ने दिलेले ब्रोकलीचे होणारे फायदे जाणून घेणे गरजेचे आहे. 

ब्रोकलीमध्ये आढळणारे पोषक तत्त्व

ब्रोकली ही तशी फ्लॉवरची एख प्रजाती आहे. पण यात आढळणारे पोषक तत्त्व फार खास असतात. ब्रोकलीमध्ये फॅटचं प्रमाण फारच कमी असतं, त्यामुळे या भाजीकडे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर म्हणूनही पाहिलं जातं. ब्रोकलीमध्ये सोडियम, पोटॅशिअम, कार्बोहायड्रेट, फायबर, प्रोटीन, कॅल्शिअम, आयर्न आणि भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी आढळतात.

वजन कमी करण्यासाठी ब्रोकली

जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्नशिल आहात, तर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ब्रोकलीचा समावेश आवर्जून केला पाहिजे. ब्रोकलीची भाजी खाल्ल्याने शरीराला आवश्यक ते पोषक तत्त्व मिळतात. तसेच जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाण्यापासूनही बचाव होतो. 

इम्यूनिटी आणि मेटाबॉलिज्म वाढवा

जर तुमची इम्यूनिटी कमजोर असेल तर मेटाबॉलिज्म सुद्धा कमजोर होऊ लागतं. ब्रोकलीच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळतं, याने शरीराची इम्यून सिस्टीम ठीक होते. इम्यून सिस्टीम ठीक असेल तर आपोआप मेटाबॉलिज्म सुद्धा मजबूत राहतं. 

अल्झायमर आणि डिमेंशियापासून बचाव

वाढत्या वयासोबत व्यक्तीला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यात एक मोठी समस्या म्हणजे स्मरणशक्ती कमजोर होणे. काही लोकांना अल्झायमर आणि डिमेंशियाचा देखील त्रास होऊ लागतो. जर तुम्हाला अल्झायमर किंवा डिमेंशियाच्या समस्येपासून दूर रहायचं असेल तर डाएटमध्ये ब्रोकलीचा समावेश करावा. 

कॅन्सरपासूनही होतो बचाव

अनेक शोधांमधून हे स्पष्ट झाले आहे की, जर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ब्रोकलीच्या भाजीचा समावेश कराल तर तुम्ही कॅन्सरसारखा आजारा दूर ठेवू शकता. ब्रोकलीची भाजी खाल्ल्याने कोलन कॅन्सर आणि लंग कॅन्सरचा धोका कमी होतो, असे म्हटले जाते. 

उन्हाळ्यात ब्रोकलीची भाजी वरदान

उन्हाळ्यात सूर्यातून निघणाऱ्या यूवी रेडिएशनने शरीरावर फार वाईट परिणाम होतो. या रेडिएशनमुळे शरीराच्या अंगांवर सूज येऊ लागते. जर तुम्हाला गरमीमुळे होणाऱ्या त्रासापासून वाचायचं असेल तर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ब्रोकलीचा समावेश करू शकता. 

हार्ट अटॅकचा धोकाही होतो कमी

डेली डाएटमध्ये जर तुम्ही ब्रोकलीची भाजी कशाही प्रकारे खात असाल तर तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचा धोकाही कमी असतो. ब्रोकलीच्या भाजीमध्ये आढळणारे पोषक तत्त्व तुमचं रक्त घट्ट होण्यापासून रोखते. ब्रोकलीमध्ये आढळणारं कॅरेटेनॉयड्स ल्यूटिन आणि पोटॅशिअम कोलेस्ट्रॉलचा स्तरही नियंत्रणात ठेवतात. 

निरोगी त्वचेसाठी ब्रोकली

जर तुम्हाला तुमची त्वचा नेहमी तरूण आणि टवटवीत ठेवायची असेल तर डाएटमध्ये ब्रोकलीच्या भाजीचा समावेश करा. कारण ब्रोकलीमध्ये आढळणारे अॅंटी-ऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन सी त्वचेला पोषण देण्याचं काम करतात.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य