वेगवेगळे पदार्थ आणि भाज्यांमध्ये वापरली जाणारी ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची केवळ पदार्थांची टेस्टच वाढवत नाही तर अनेक आजार कंट्रोलही करते. अनेक आजारांचा धोका कमी करते. या मिरचीच्या नियमित सेवनाने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.
नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थनुसार शिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि इतर पोषक तत्व भरपूर असतात. जे आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर असतात. आठवड्यातून 4 ते 5 वेळा याचा डाएटमध्ये समावेश केला तर अनेक आजारांचा धोका टाळता येऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला याचे फायदे सांगणार आहोत.
इम्यून सिस्टीम मजबूत होतं
हिरव्या शिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं, जे आपली इम्यून सिस्टीम मबतूत करतं. तसेच अनेक आजारांपासून लढण्यास मदत मिळते. इम्यून सिस्टीम मजबूत राहिलं तर अनेक गंभीर आजारांपासून बचाव करता येऊ शकतो.
हृदय निरोगी राहतं
शिमला मिरचीमध्ये पोटॅशिअम आणि फोलेटचं प्रमाणही भरपूर असतं. जे हृदयासाठी फायदेशीर असतं. याने हाय ब्लड प्रेशर आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो. शिमला मिरचीच्या सेवनाने ब्लड वेसल्सच्या समस्येपासूनही बचाव होतो.
जॉइंट्सची समस्या
ऑस्टियोआर्थरायटिस, रुमेटाइड आर्थरायटिस या फायब्रोमायल्गिया सारखी हाडांची समस्या असेल या समस्या शिमला मिरची दूर करण्यास मदत करते. जर याचं सेवन योग्यपणे केलं तर या समस्या दूर केल्या जाऊ शकतात.
वेदना होतात दूर
रिसर्चनुसार शिमला मिरचीमध्ये एक खास तत्व असतं ज्याला कॅप्सेसिन म्हटलं जातं. याने त्वचेला होणाऱ्या वेदनेपासून आराम मिळतो. हेल्थ एक्सपर्टनुसार शिमला मिरचीची पेस्ट वेदना होत असलेल्या जागेवर लावली तर आराम मिळतो. यासोबतच याने हेलिकोबॅक्टर पिलोरीपासूनही बचाव होतो. हेलिकोबॅक्टर पिलोरी गॅस्ट्रोइंटेस्टिनल संबंधी आजार आहे.
इन्फेक्शन करते कंट्रोल
हिरव्या शिमला मिरचीमध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी सारखे पोषक तत्व बॅक्टेरिअल इन्फेक्शन विरोधात लढतात. यात असलेल्या अॅंटी-ऑक्सिडेंटने बॅक्टेरिअल इन्फेक्शन दूर होतं आणि शरीरातून बाहेर निघतं.