Soaked Moong Benefits : आजकाल लोक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि फीट राहण्यासाठी पौष्टिक आहारावर अधिक भर देतात. हिवाळ्यात तर अनेक पौष्टिक पदार्थांचं सेवन केलं जातं. वेगवेगळे कडधान्य भिजवून खातात. यातीलच एक म्हणजे मूग. मूग डाळीचं तर लोक वेगवेगळ्या पद्धतीने सेवन करतातच. मात्र, अनेकांना भिजवलेले मूग खाण्याचे फायदे माहीत नसतात. तेच आज आम्ही सांगणार आहोत. खासकरून हिवाळ्यात भिजवलेल्या मुगाचं सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळतात.
मुगाची खासियत
मुगात प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर असतात. ज्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते, वजन कमी होण्यास मदत मिळते, तसेच हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं. महत्वाची बाब म्हणजे मूगाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे शरीरात शुगर लेव्हल हळूहळू वाढते.
मूग भिजवून खाण्याचे फायदे
१) पचनक्रिया सुधारते
मूग भिजवून ठेवल्याने ते मुलायम होतात आणि यातील विषारी तत्व निघून जातात. मुगाच्या नियमित सेवनाने पचनक्रिया आणखी मजबूत होते आणि पोटासंबंधी समस्या जसे की, बद्धकोष्ठताही दूर होते. तसेच मूग भिजवून खाल्ले तर पचनही लवकर होतात आणि त्यातील पोषक तत्वांचं अवशोषणही चांगलं होतं.
२) वजन कमी होतं
हिरवे मूग भिजवून खाल्ल्याने वजन कमी करण्यासही मदत मिळते. कारण यात कॅलरी खूप कमी असतात. यात फायबर भरपूर असल्याने पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. याने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि शरीरातील विषारी तत्वही बाहेर पडण्यास मदत मिळते. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर मूगाचा तुमच्या आहारात समावेश करा.
३) हृदयासाठी फायदेशीर
मुगात पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि फॉलिक अॅसिडसारखे महत्वाचे तत्व असतात, जे हृदयासाठी फायदेशीर असतात. याने ब्लड प्रेशर कंट्रोल होतं, हृदयाची धडधड नियमित होते आणि रक्तात वाढलेली कोलेस्ट्रॉल लेव्हलही कमी होते. मूगाच्या नियमित सेवनाने हृदयासंबंधी समस्यांचा धोका कमी राहतो.
४) किडनीसाठी फायदेशीर
मुगाचं किंवा मूग डाळीचं नियमित सेवन केल्यास किडनीची कार्यक्षमता चांगली होते. याने शरीरात वाढलेलं यूरिक अॅसिड आणि विषारी तत्व बाहेर काढण्यास मदत मिळते. त्यासोबतच किडनीचा इन्फेक्शनपासूनही बचाव होतो.
५) इम्यून सिस्टीम मजूबत होतं
मुगात आयर्न, झिंक आणि सेलेनियमसारखे खनिज असतात, जे शरीराची इम्यूनिटी वाढवतात. याने शरीराची रोगांसोबत लढण्याची क्षमता वाढते. तसेच यात अॅंटी-ऑक्सिडेंट्सही असतात जे शरीराचा फ्री रॅडिकल्सपासून बचाव करतात.
कसं करावं सेवन?
मूग भिजवण्याआधी चांगले धुवून घ्या. नंतर ते पाण्यात ६ ते ८ तासांसाठी भिजवून ठेवा. सकाळी याचं सेवन सलाद म्हणून करू शकता. याची टेस्ट वाढवण्यासाठी यात लिंबाचा रस, काळे मिरे टाकू शकता.