शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पेरू तर अनेकदा खाल्ले असतील आता पेरूच्या पानांचे फायदे जाणून घ्या, वाचाल तर रोज खाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2024 10:21 AM

Guava Leaves Benefits : पेरूची पाने सकाळी रिकाम्या पोटी चावून खाल्ल्यावर काय फायदे मिळतात हे जाणून घेऊया.

Guava Leaves Benefits : हिवाळ्यात आंबट-गोड चवीचा पेरू खाण्याचा आनंद सगळेच घेत असतात. पेरूची टेस्ट सगळ्यांना तर आवडतेच, सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. पेरूमध्ये अनेक पोषक तत्व असतात. पण अनेकांना हे माहीत नाही की, पेरूसोबतच पेरूच्या पानांमध्येही अनेक औषधी गुण असतात. पेरूच्या पानांमध्ये भरूर प्रमाणात खनिज, व्हिटॅमिन्स आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि पोटॅशिअम भरपूर असतं. अशात पेरूची पाने सकाळी रिकाम्या पोटी चावून खाल्ल्यावर काय फायदे मिळतात हे जाणून घेऊया.

पेरूची पाने खाण्याचे फायदे

बद्धकोष्ठता लगेच होईल दूर

पेरूच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं जे बद्धकोष्ठतेची समस्या सहजपणे दूर करतं. याने पचनास मदत मिळते आणि सकाळी पोट लवकर साफ होतं. पेरूच्या पानांमुळे रक्तात ग्लूकोजची लेव्हल वाढणंही रोखलं जातं.

इम्यूनिटी वाढते

पेरूच्या पानांच्या सेवनाने जेवण केल्यावर ब्लड शुगर लेव्हल वाढत नाही. पेरूच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन्स सी असतात. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. अशात शरीराचा अनेक आजार आणि इन्फेक्शनपासून बचाव होतो.

डोळ्यांसाठी फायदेशीर

पेरूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं. जे डोळ्यांसाठी खूप गरजेचं आहे. नियमितपणे रिकाम्या पोटी पेरूच्या पानांचं सेवन केल्याने डोळ्यांची दृष्टी चांगली होते. पेरूच्या पानांमध्ये तणाव दूर करणारे गुण असतात आणि मानसिक आरोग्यही चांगलं राहतं.

पेरूच्या पानांचे इतर फायदे

- पेरूच्या पानांमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट, व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम आणि फायबर भरपूर असतात. या तत्वांमुळे तुमचं हृदय, पचन आणि शरीरक्रिया योग्य राहतात. 

- पेरूच्या पानांचा चहा सेवन केल्यावर जेवल्यावर वाढलेली ब्लड शुगर लेव्हल कमी होते. अशात डायबिटीसच्या रूग्णांनी या पानांचं किंवा याच्या चहाचं सेवन केलं पाहिजे.

- पेरूच्या पानांमधील अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन हृदयाचा फ्री रॅडिकलपासून बचाव करतात. त्याशिवाय या पानांचा अर्क लो ब्लड प्रेशर, बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतो आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढवतो.

-  पेरूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी असतं. याने इम्यून सिस्टीम मजबूत होण्यास मदत मिळते. ज्यामुळे तुमचा वेगवेगळ्या आजारांपासून आणि इन्फेक्शनपासून बचाव होतो.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य