Fenugreek seeds benefits : हिरव्या पालेभाज्यांमध्ये मेथीला फार महत्व आहे. कारण या भाजीची टेस्टही चांगली असते आणि यातून शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात. पण अनेकांना मेथीच्या दाण्यांचे फायदे माहीत नसतात. मेथीच्या दाण्यांचे मेथीच्या भाजींपेक्षाही जास्त फायदे मिळतात. जर मेथीच्या बियांचं पाणी प्यायले तर तुम्हाला इतके फायदे मिळतील की, तुम्ही विचारही केला नसेल. तेच आज आम्ही सांगणार आहोत.
मेथीच्या बियांचे फायदे
1) बद्धकोष्ठतेची समस्या होऊ द्यायची नसेल तर एक चमचा मेथीच्या बीया 2 ग्लास पाण्यात टाकून उकडू द्या. पाण्याला मेथीचा रंग येईपर्यंत हे उकडू द्या. नंतर पाणी गाळून मेथीचे दाणे वेगळे करा आणि पाणी थंड होऊ द्या. हे पाणी कोमट झाल्यावर एक एक घोट सेवन करा. याचा तुम्हाला लवकरच फायदा दिसेल.
2) मेथीच्या बियांच्या पाण्याच सेवन नियमितपणे केलं तर याने पचनक्रियाही चांगली होईल. इतकेच नाही तर पोटाशी संबंधित अनेक समस्याही याने दूर होतात.
3) अनेक लोकांना रात्री लवकर किंवा चांगली झोप येत नाही. जर तुम्हाला रात्री चांगली झोप येत नसेल तर तुम्ही मेथीच्या दाण्यांचं पाणी पिऊ शकता. याने तुम्हाला रात्री चांगली झोप येईल.
4) मेथीच्या बियांचं वेगवेगळ्या पद्धतीने सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हलही संतुलित करण्यास तसेच किडनीसंबंधी समस्या दूर करण्यास मदत मिळते.
5) तसेच मेथीच्या बियांमुळे डायबिटीसची समस्या दूर करण्यास आणि हृदयासंबंधी समस्या दूर करण्यास व केस चांगले ठेवण्यास मदत मिळते.
6) मेथीच्या पाण्याने फुप्फुसांसंबंधी समस्यांचा धोकाही कमी केला जाऊ शकतो. या वेगवेगळ्या समस्यांचा धोका कमी करण्यासाठी मेथीच्या पाण्याचं सेवन आठवड्यातून साधारण तीन ते चार वेळा करावं.
कसं बनवाल मेथीचं पाणी?
तुम्ही मेथीचं पाणी दोन पद्धतीने बनवू शकता. पहिली पद्धत म्हणजे एक कप किंवा एक ग्लास पाण्यात एक चमचा मेथीचे दाणे टाकून रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी पाणी गाळून घ्या आणि पाण्याचं सेवन करा.
दुसरा उपाय म्हणजे सकाळी एक ग्लास पाण्यात एक चमचा मेथीच्या बीया टाकून उकडा. हे पाणी गाळून घ्या आणि सेवन करा. तसेच आपल्या हर्बल टी मध्ये टाकूनही याचं सेवन करू शकता. भिजवलेल्या किंवा शिजलेल्या मेथीच्या बीया तुम्ही चावून खाऊ शकता.