Rock Sugar And Cardamom Benefits: आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी लोक अनेक घरगुती उपाय करत असतात. यातील एक महत्वाचा उपाय म्हणजे वेलची आणि खडी साखरेचं मिश्रण. आयुर्वेदात याला रामबाण उपाय मानलं जातं. या दोन्ही गोष्टी सहजपणे कुठेही मिळतात. महत्वाची बाब म्हणजे यांचे आरोग्याला अनेक फायदे होतात. ज्याबाबत फार कमी लोकांना माहीत असतं.
वेलचीला मसाल्यांची राणी म्हटलं जातं तर खडी साखर अनेक समस्या दूर करणारी आहे. हृदयरोग, पोटाच्या समस्या, अॅसिडिटी, अपचन, इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी या गोष्टींचं चार पद्धतीने सेवन केलं जाऊ शकतं.
इम्यूनिटी वाढते
वेलचीमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट आणि आवश्यक ऑईल भरपूर असतं. ज्याने इम्यूनिटी वाढवण्यास मदत मिळते. यातील बॅक्टेरिअल गुणांमुळे शरीराचा अनेक आजार आणि इन्फेक्शनपासून बचाव होतो. तेच खडी साखर नॅचरल थंडावा आणि इंस्टेंट एनर्जीचं काम करते. या दोन्ही गोष्टी मिक्स केल्यास इम्यूनिटी मजबूत होते. ज्यामुळे ताप, सर्दी, खोकला या समस्या होत नाहीत.
वजन कमी होतं
वेलचीमध्ये मेटाबॉलिज्म बूस्ट करण्याची क्षमता असते. ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते. वेलचीमधील काही तत्व असे असतात जे अन्न पचन होण्यास मदत करतात. ज्यामुळे तुमच्या शरीरात चरबी वाढत नाही.
डायजेशन
वेलची आणि खडी साखरेचं एकत्र सेवन केल्याने पचन तंत्र मजबूत होतं. वेलचीने डायजेस्टिव एंझाइम अॅक्टिव करणे, डायजेशन सुधारणे, अपचन, सूज आणि गॅसची समस्या दूर करण्यास मदत मिळते. जेवण केल्यावर वेलची आणि खडी साखर एकत्र खाल्ल्यास पचनक्रिया चांगली होते.
खडी साखर आणि वेलचीचे फायदे
- जेव्हा ब्लड प्रेशर कंट्रोल करण्याचा विषय येतो तेव्हा वेलची खूप फायदेशीर ठरते.
- योग्य प्रमाणात सेवन केल्याने खडी साखरेमुळे इलेक्ट्रोलाइट संतुलित राहण्यास मदत मिळते.
- वेलचीमधील आवश्यक तेल मेंदू शांत होतो आणि तुमचा मूडही चांगला होतो.
- अॅंटी-ऑक्सिडेंट्स असल्याने वेलची फ्री रॅडिकल्स नष्ट करण्यास मदत करते. हे फ्री रॅडिकल्स त्वचेसाठी आणि शरीरासाठी घातक असतात.
वेलची आणि खडी साखरेचं कसं कराल सेवन?
- एक ग्लास कोमट पाण्यात चिमुटभर बारीक केलेली वेलची पावडर आणि थोडी खडी साखर मिक्स करा. सकाळी याचं तुम्ही सेवन केल्यास दिवसभर फ्रेश वाटेल.
- जेवण केल्यावर खडी साखरेच्या एका तुकड्यासोबत वेलचीचं सेवन करा.
- आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तुमच्या चहामध्ये वेलची आणि खडी साखर टाका.