Kulthi Dal Benefits : सामान्यपणे रोज सगळ्यात भारतीय घरांमध्ये वेगवेगळ्या डाळींचं सेवन केलं जातं. त्यात तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, उडीद डाळ या डाळींचा समावेश असतो. या डाळींमधून शरीराला अनेक पोषक तत्वही मिळतात. मात्र, अनेक लोकांना कुळीथ डाळीचे फायदे माहीत नसतात. त्यामुळे मोजक्याच भागांमध्ये या डाळीचं सेवन केलं जातं. आज आम्ही तुम्हाला या डाळीच्या सेवनाचे फायदे सांगणार आहोत. एकदा जर तुम्ही या डाळीच्या सेवनाचे फायदे वाचाल तर ही डाळ नेहमीच खाल.
वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या डाळी महत्त्वाची भूमिका निभावतात. यात महत्त्वाची डाळ म्हणजे कुळीथ. या डाळीबाबत अनेकांना फारशी माहीत नसते. या डाळीची खासियत म्हणजे याते प्रोटीन आणि पोषक तत्त्वांचं प्रमाण भरपूर असतं. ज्यामुळे वजन कमी होण्यासोबतच आरोग्यालाही अनेक फायदे होतात.
कुळीथ डाळीचा वापर उत्तराखंडमध्ये अधिक केला जातो. जर तुम्हालाही वजन कमी करण्याची किंवा नियंत्रणात ठेवण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी कुळीथ डाळ फार फायदेशीर ठरू शकते. सामान्यपणे शाकाहारी लोक त्यांना जेवढी प्रोटीनची गरज असते ती पूर्ण करू शकत नाहीत. अशात त्यांची प्रोटीनची गरज कुळीथ डाळ पूर्ण करू शकते.
डाळीची खासियत
एक वाटी कुळीथ डाळीमधून तुम्हाला जवळपास १५ ते १० टक्के प्रोटीन मिळू शकतं. त्यामुळे रोजच्या आहारात या डाळीचा तुम्ही समावेश करू शकता. केवळ प्रोटीनच नाही तर या डाळीमध्ये फायबरचं प्रमाणही भरपूर असतं. वजन कमी करण्याचा हिशेबाने बघायचं तर ही डाळ खाल्ल्यावर बराच वेळ पोट भरून राहतं. त्यामुळे तुम्ही ओव्हरइटिंगपासून दूर राहता.
किडनी स्टोन होईल दूर
एक्सपर्ट सांगतात की, कुळीथ डाळीचं चूर्ण बनवून ते पाण्यासोबत सेवन करू शकता. त्याशिवाय भिजवलेली कुळीथ डाळ चावून खाऊ शकता. ज्यांना किडनी स्टोनची समस्या आहे त्यांनी 5 ते 7 दिवस रोज याचं सेवन केल्याने किडनी स्टोनची समस्या दूर होऊ शकते.
कुळीथ डाळीचे फायदे
१) कुळीथ डाळ खाल्ल्याने ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं. आणि पोटाच्या समस्यांपासून सुटका मिळते. आयुर्वेदातही सांगण्यात आलं आहे की, कुळीथ डाळ खाऊन महिलांना हार्मोनल बदलामुळे होणारी प्रीमेंसट्रअल ब्लोटिंगची समस्याही दूर होते.
२) रोज या डाळीचे सेवन केल्याने शरीराची पचनक्रिया चांगली राहते. तुम्ही जे काही खाल ते व्यवस्थित पचतं.
३) कुळीथ डाळ तुम्ही भातासोबत खाऊ शकता. तसेच या डाळीचं पीठ तुम्ही राजमा किंवा करीमध्ये टाकूनही खाऊ शकता.
४) वजन कमी करण्यास मदत करणारी कुळथीच्या डाळीचे पीठ पाण्यात मिश्रित करून सेवनही करू शकता. याने आरोग्याला अनेक फायदे होतात. दक्षिण भारतात ही या डाळीचं पीठ पाण्यात उकडून या पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे दक्षिण भारतातील महिला लवकर जाडेपणाचा शिकार होत नाही, असेही सांगितले जाते.
५) कुळीथ डाळीमुळे वात व कफ कमी होतो. कुळीथ मुतखड्यावर औषधाप्रमाणे काम करते. मेद वाढला असेल, सूज आली असेल, जंत झाले असेल तर ही डाळ फायदेशीर ठरू शकते.