उन्हाळा सुरू झाला की, लोकांना खूप तहान लागते आणि डॉक्टरही या दिवसात जास्त पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण सगळ्यांना ते शक्य होत नाही. अशात शरीरात डिहायड्रेशनची समस्या होते. यामुळे तुम्हाला कमजोरी, चक्कर येणे, ताप येणे अशा समस्या होऊ लागतात. उष्णता वाढल्याने शरीराचे तापमानही वाढते. त्यामुळे शरीराला गारवा मिळवा यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात खरबूज हे फळ सर्वोत्तम मानलं जातं. यामध्ये पोषण तत्वे भरपूर प्रमाणात आहेत.
मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स
खरबुजात भरपूर पाणी सोबतच मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सही असतात. ज्यामुळे शरीराशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. पिकल्यानंतर या फळाचा रंग पिवळा होतो. पिकलेलं फळ हे त्याच्या चविष्ट घट्ट गोडसर गरासाठी प्रसिद्ध आहे.
शरीरात पाणी वाढतं
खरबुजाच्या या गुणामुळे उन्हाळ्याच्या दिवसात शरीराचे तापमान सर्वसाधारण राखण्यास मदत होते. खरबुजामध्ये असलेले पाण्याचे मोठे प्रमाण शरीरात कधीच अपचन होऊ देत नाही. खरबुजामधील क्षारमुळे पचनसंस्था उत्तम राहते. खरबुजातील असलेले कॅरिटीनॉयड कर्करोगापासून बचाव करण्यासाठी मदत करते. विशेषत: खरबूजातील बिया याबाबत खूपच फायदेशीर ठरतात.
किडनीसाठी फायदेशीर
खरबुजामध्ये पाणी भरपूर असतं आणि ऑक्सिकायन तत्व आढळतं. ज्यामुळे किडनी स्टोनची समस्या होत नाही आणि स्टोन सहजपणे बाहेर पडतात. हे फळं किडनीसाठी फार फायदेशीर मानलं जातं.
रक्ताच्या गाठी होत नाही
खरबुजात एंडीनोसीन नावाचे तत्त्व असते. जे शरीरात रक्ताची गुठळी वा डाग होऊ देत नाही. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो. याच्या नियमित सेवनाने हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. खरबुजाचे नियमित सेवन किडनी समस्येतील रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे.
कसं करावं सेवन?
विशेषकरून लिंबाच्या रसाबरोबर त्याचे सेवन युरिक अँसिडशी संबंधित समस्या दूर करते. नितळ त्वचेसाठीही खरबूज उपयोगी आहे. त्याच्यामध्ये कोलाजेन नावाचे तत्त्व मोठय़ा प्रमाणात असते जे त्वचेला सौंदर्य व कांती प्रदान करते.