सामान्यपणे लोक चहा पितात त्यात साखर, चहा पावडर आणि दूध असतं. तर काही लोक आरोग्य चांगलं राहण्यासाठी लिंबाचा चहा पितात किंवा ग्रीन टी पितात. चहामध्ये आलंही टाकलं जातं. पण अनेकांना हे माहीत नाही की, कांद्याचाही चहा केला जातो आणि त्याचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात.
कांद्याचा चहा हा आयुर्वेदात एक औषधी मानलं जातं. जर हिवाळ्यात तुम्ही कांद्याचा चहा घेतला तर तुम्हाला थंडी वाजणार नाही. सोबतच तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमताही याने वाढते. तुळस, आलं, वेल या पदार्थांच्या चहाबाबत तुम्हाला माहीत आहेच, पण कांद्याच्या चहाबाबत तुम्ही कधी ऐकलं नसेल. ऐकायला भलेही हे अजब वाटत असलं तरी कांद्याच्या चहाचे फायदे मात्र अनेक आहेत.
कांद्याचा चहा तयार करण्यासाठी पाणी उकडून त्यात कापलेला कांदा टाका आणि आणखी चांगल्याप्रकारे उकडू द्या. त्यानंतर हे पाणी गाळा. नंतर यात लिंबाचा रस किंवा चवीसाठी टी बॅगही टाकू शकता. गोडव्यासाठी यात तुम्ही मध टाकू शकता.
कांद्याच्या चहाचे मुख्य फायदे
1) डायबिटीजच्या रुग्णांसाठी हा चहा फार फायदेशीर ठरु शकतो. तसेच वजन कमी करण्यासाठीही कांदा प्रभावी मानला जातो.
2) एका शोधानुसार, कांद्याचा चहा टाइप-२ डायबिटीजमध्ये आराम देण्यासाठी फायदेशीर ठरतो. तसेच कांद्याच्या चहाने फ्री रेडिकल्स नष्ट करण्यासाठी मदत करु शकतात.
3) कांद्याचा चहा कॅन्सरच्या पेशींचा विकास रोखण्यासही फायदेशीर ठरतो. खासकरुन कोलोन कॅन्सरमध्ये हा चहा फायदेशीर मानला जातो.
4) झोप न येण्याची समस्या असेल तर कांद्याचा चहा फायदेशीर आहे. याने तुम्हाला चांगली झोप येईल.
5) कांद्याच्या चहाचं सेवन केल्याने हायपरटेंशनपासून बचाव होण्यास मदत मिळते. त्यासोबतच रक्ताच्या गाठी होणे रोखण्यासही याने मदत मिळेल.