Papaya benefits : पपई आरोग्यासाठी एक फार खास फळ मानलं जातं. हे फळ मुळात मध्य अमेरिका आणि दक्षिण मेक्सिकोमधून आलं. पण आता जगतील सगळ्याच भागांमध्ये उगवलं जातं आणि मिळतं. पपईमध्ये पपेन नावाचं एक तत्व असतं. जे शरीरातील कठोर प्रोटीनला तोडण्याचं काम करतं. या फळांमध्ये कार्बोहायड्रेट, फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी9, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम असतात. हे सगळे तत्व शरीरासाठी फार फायदेशीर असतात.
पपईचं सेवन लोक जास्त उन्हाळ्यात करतात. कारण यात पाणी भरपूर असतं. ज्यामुळे शरीर हायड्रेट राहतं. त्याशिवाय तुमची त्वचा, केस आणि पोटाच्या आरोग्यासाठीही पपईच्या बीया रामबाण उपाय आहे. तसेच याचे इतरही फायदे आज आम्ही सांगणार आहोत.
पपई खाण्याचे फायदे
1) तुम्हाला कदाचित अंदाज की, पपई परदेशात आर्गेनिक पद्धतीने उगवली जाते. ज्याचा भाव 1 लाख पर्यंत असतो. तरीही लोक ते खरेदी करतात.
2) हे फळं जर तुम्ही रोज खाल तर यामुळे तुमच्या त्वचेवर कधीच पिंपल्स होणार नाही. सोबतच चेहरा उजळतो. तसेच शरीराची इम्यूनिटी पॉवरही वाढते.
3) हे फळ वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर आहे. हे फळ खाल्ल्यावर भूक कमी लागते. ज्यामुळे जास्त खाण्यापासून आपला बचाव होतो.
4) पपई बॅड कॉलेस्ट्रोल कमी करण्यासोबतच डायबिटीस, लठ्ठपणा आणि हृदयाच्या समस्या दूर करण्यासही फायदेशीर ठरते.
5) इतकंच नाही तर यात पोटॅशिअम भरपूर असतं. ज्यामुळे ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये राहतं. नेहमीच्या आहारात पपई समावेश केला तर अनेक फायदे मिळतात.
6) पपईमध्ये फायबर भरपूर असतं आणि याने विष्ठा जड होते. अशात जर रिकाम्या पोटी पपई खाल्ली तर बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत मिळते.
पपईच्या बीया खाण्याचे फायदे
1) सर्दी-पळश्यापासून आराम
पपईच्या बियांमध्ये पोलिफेनोल्स आणि फ्लेवोलोइड्ससारखे अॅंटी-ऑक्सिडेंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्सचा प्रभाव कमी करतात. ज्यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होऊ लागतो. तुम्ही सर्दी-पळश्यासारख्या समस्यांपासूनही दूर राहता.
2) कोलेस्ट्रॉल लेवल कमी होईल
पपईच्या बियांमध्ये फॅटी अॅसिड असतं जे रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करतं. जेव्हा तुमच्या धमण्यांमध्ये प्लाक कमी तयार होतो तेव्हा ब्लड प्रेशर कमी होतं. अशा तुम्ही हार्ट अटॅक, कोरोनरी ऑर्टरी डिजीज आणि ट्रिपल वेसेल्स डिजीजसारख्या हृदयरोगांपासून वाचू शकता.
3) वजन होईल कमी
पपईच्या बियांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं. जे डायजेशन चांगलं करण्यात फायदेशीर असतं. जर पचन तंत्र चांगलं राहिलं तर तुम्ही लठ्ठपणाचे शिकार होणार नाहीत आणि वाढणारं वजनही कमी होईल.
कसं करावं या बियांचं सेवन?
आता प्रश्न हा आहे की, पपईच्या बियांचं सेवन कसं करावं? त्यासाठी या बीया पाण्याने धुवा, नंतर त्या उन्हात वाळत घाला. नंतर त्याचं पावडर तयार करा. हे पावडर तुम्ही शेक, मिठाई ज्यूससोबत सेवन करा. कारण याची टेस्ट कडवट असते. त्यामुळे गोड पदार्थासोबत याचं सेवन करा.