Drinking Water While Sitting in Malasana : दिवसाची चांगली सुरूवात आरोग्यासाठी खूप महत्वाची असते. आयुर्वेदात आणि योगाभ्यासात काही अशा परंपरा आहेत, ज्यामुळे शरीर तर हेल्दी राहतंच, सोबतच मानसिक आरोग्यही चांगलं राहतं. यातील एक म्हणजे मलासनामध्ये बसून पाणी पिणे.
मलासन हे एक सोपं आणि साधं आसन आहे. ज्यात व्यक्ती गुडघ्यांना वाकवून बसते आणि हात जोडून बॅलन्स करते. अशात या आसनामध्ये बसून पाणी प्यायल्याने काय होतं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मलासनात बसून पाणी पिण्याचे फायदे
1) पचन तंत्र सुधारतं
मलासनात बसून पाणी प्यायल्याने पचन तंत्र सुधारण्यास मदत मिळते. याने पोटातील अवयव सक्रिय होतात आणि आतड्यांचं आरोग्यही चांगलं राहतं. तसेच या क्रियेने बद्धकोष्ठता, अॅसिडिटी आणि पचनसारख्या समस्याही दूर होतात.
2) डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत
मलासनात बसून पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत मिळते. या प्रक्रियेने शरीराचं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं, ज्यामुळे विषारी पदार्थ फ्लश आऊट करणं सोपं जातं.
3) वजन कमी होतं
वजन कमी करण्यासाठी डायजेशन आणि मेटाबॉलिज्म चांगलं असणं गरजेचं आहे. मलासनमध्ये बसून पाणी प्यायल्याने पोटावरील चरबी कमी करण्यास मदत मिळते. कारण या स्थितीत पोटावर दबाव पडतो. ज्यामुळे फॅट बर्न वेगाने होतं.
4) किडनीचं आरोग्य चांगलं राहतं
मलासनात बसून पाणी प्यायल्याने किडनीची कार्यक्षमता वाढते. याने किडनीचा फ्लो सुधारतो. ज्यामुळे यूरिनरी ट्रॅक्टची सफाई होते आणि किडनीसंबंधी समस्यांचा धोकाही कमी होतो.
5) हार्मोनल बॅलन्स
या आसनामुळे शरीरात हार्मोनल बॅलन्स कायम ठेवण्यास मदत मिळते. खासकरून महिलांसाठी हे मासिक पाळीदरम्यान फायदेशीर असतं.
6) मांसपेशींसाठी फायदेशीर
मलासनमध्ये बसून पाणी प्यायल्याने जॉइंट्समध्ये आणि मांसपेशींमध्ये लवचिकपणा येतो. याने अनेक अवयव मजबूत होतात. वेदना आणि सूजही कमी होते.
7) तणाव कमी होतो
या आसनामध्ये बसून पाणी प्यायल्याने मानसिक शांतता मिळते आणि तणावही कमी होते. याने दिवसाची सुरूवात केली तर दिवसभर ताजंतवाणं वाटतं.
कसं प्याल पाणी?
सकाळी रिकाम्या पोटी सगळ्यात आधी मलासनात बसा. एक ग्लास कोमट पाणी हळूहळू प्या. यादरम्यान पाठ ताठ असली पाहिजे. या स्थितीमध्ये कमीत कमी 5 ते 10 मिनिटे बसा.