Home Remedies: पावसाळ्यात आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होत असतात. लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होतात. या दिवसात सर्दी-खोकला होणे तर फारच कॉमन आहे. सोबतच या दिवसात घशात वेदना किंवा खवखव अशाही समस्या होतात. या समस्या दूर करण्यासाठी एक बेस्ट घरगुती नॅचरल उपाय म्हणजे लसूण. त्यासोबतच इतरही काही घरगुती उपाय आहेत ज्यामुळे घशाची वेदना दूर करता येते. जाणून घेऊया ते उपाय...
घशातील वेदना दूर करण्याचे उपाय
कच्चा लसूण
लसणाचा वापर वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी केला जातो. लसणामध्ये अॅंटी-सेप्टिक, अॅंटी-बॅक्टेरिअल, अॅंटी-फंगल आणि अॅंटी-वायरल गुण असतात जे घशाचं दुखणं दूर करण्यास मदत करतात. एक लसणाची कळी कच्ची चाऊन खाल्ल्याने किंवा एका कळीचे दोन तुकडे करून १० ते १५ मिनिटे चघळल्याने घशातील वेदना दूर होण्यास मदत मिळते. नुसता कच्चा लसूण खाणं होत नसेल तर त्याचे बारीक तुकडे करून मधासोबत खाऊ शकता.
मिठाचं पाणी
मिठाचं पाणी सुद्धा घशातील वेदना दूर करण्यास मदत करतं. एक ग्लास गरम पाण्यात अर्धा चमचा मीठ किवा बेकिंग सोडा मिक्स करा. हे पाणी प्यायल्याने घशातील वेदना दूर होईल आणि सोबतच छातीतील जमा कफही बाहेर निघेल.
मध आणि लिंबू
घशातील वेदना दूर करण्यासाठी मध आणि लिंबाच्या रसाचं मिश्रण सवन करू शकता. यात अॅंटी-इन्फ्लेमेटरी आणि अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. जे घशाला आराम देतात. एक चमचा लिंबाच्या रसात एक चमचा मध मिक्स करा. याने घशाला आराम मिळेल.
अॅपल व्हिनेगर
घशातील बॅक्टेरिया मारण्यासाठी अॅपल व्हिनेगरचा वापर करू शकता. अॅपल व्हिनेगर कफ दूर करण्यासही मदत करतं. याने गुरळा केल्याने घशातील वेदना दूर होईल. एक ग्लास पाण्यात एक चमचा अॅपल व्हिनेगर टाका. या पाण्याने घसा साफ होतो.