Raw Onion: कांदा भारतीय किचनमधील महत्वाचा भाग आहे. वेगवेगळे पदार्थ, भाज्यांमध्ये कांद्याचा वापर केला जातो. अनेक तर असे पदार्थ असतात जे कांद्याशिवाय बनवलेच जाऊ शकत नाहीत. कांद्यामुळे पदार्थाला टेस्ट तर मिळतेच सोबतच कांद्याचे आरोग्यालाही खूप फायदे होतात. कांदा एक औषधी म्हणून वापरला जातो. वेगवेगळे उपचार करण्यासाठी कांदा वापरला जातो. बरेच एक्सपर्ट कच्चा कांदा खाण्याचाही सल्ला देतात. कच्चा कांदा शरीराची उष्णता कमी करण्यास मदत करतो. आज आपण कच्चा कांदा खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.
कच्च्या कांद्यातील पोषक तत्व
कच्चा कांदा शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करतो. याचं सेवन केल्याने शरीरात पाणी कमी होत नाही. कांद्यामध्ये सोडिअमसोबतच पोटॅशिअमही असतं. ज्यामुळे शरीरात इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन राहतं. कच्च्या कांद्यामध्ये क्वेरसेटिन आणि सल्फर तत्व असतात. जे शरीरासाठी एका कुलंटसारखं कम करतात. कांद्यामध्ये फ्लेवोनोइड्स, पॉलीफेनोल्स आणि सल्फरसारखे तत्व असतात ज्यामुळे कांद्यात अनेक अॅंटी-ऑक्सिडेंट्स, अॅंटी कॅन्सरसारखे तत्व असतात.
कच्चा कांदा खाण्याचे फायदे
डायजेशन चांगलं होईल
उन्हाळ्यात शरीराचं तापमान मेंटेन ठेवणं एक अवघड काम असतं. या दिवसात हृदय, फुप्फुसं आणि किडन्यांवर इतर दिवसांच्या तुलनेत जास्त दबाव पडतो. त्यामुळे कांद्यातील एलिल सल्फाइड फायदेशीर ठरतं. जे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवतं. त्याशिवाय कांद्याने पचनासाठी आवश्यक रस रिलीज होतो. ज्यामुळे अपचन अशा समस्या होत नाही. कांद्यामध्ये फायबरही भरपूर असतं. ज्यामुळे पोट साफ राहतं. पोट भरून राहतं. आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं.
पुरूषांसाठी अधिक फायदेशीर
कांद्यामध्ये क्रोमियम भरपूर असतं. हे एक असं तत्व आहे जे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवतं. डायबिटीसचे रूग्ण कांदा खाऊन ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवू शकतात. कांद्यामुळे शरीर चांगलं डिटॉक्स होतं कारण याने लघवी भरपूर तयार होते. जे पुरूष कच्चा कांदा खातात त्यांच्या शरीरात टेस्टोस्टेरोनची निर्मिती वाढते. ज्यामुळे पुरूषांची शक्ती वाढते. लैंगिक जीवन चांगलं राहतं.