कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहेत. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून जगभरातील अनेक देशांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कारण कोरोना रुग्णांची संख्या आणि संक्रमित मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. जगभरातील कोरोना रुग्णांचा आकडा १ कोटींवर पोहोचला आहे. त्यातील ४२ लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण हे अमेरिकेतील आहे. या माहामारीच्या काळात अमेरिकेवर एक नवीन संकट ओढावलं आहे.
अमेरिकेतील तब्बल ११ राज्यांतील ६०० पेक्षा जास्त लोकांना सायक्लोस्पोरा (cyclospora) नावाचा आजार झाला आहे. हा आजार पसरण्याचं कारणंही समोर आलं आहे. सायक्लोस्पोरा हा आजार पॅकेटमध्ये विकल्या जाणाऱ्या सॅलडमुळे होतो. पॅकेट सॅलडमध्ये आइसबर्ग लेटस, कोबी आणि गाजर या भाज्या असतात. हे सॅलड खाल्यानंतर तब्बल ६४१ जणांना या विचित्र आजाराची लागण झाली आहे. यातील ३७ रुग्णांना रुग्णालयात दाखलही करण्यात आले आहे.
सूक्ष्म परजीवींशी संबंधित हा सायक्लोस्पोरियासिस हा आजार आहे. या रोगाची भूक न लागणे, पोट फुगणे, मळमळ, सौम्य ताप, थकवा आणि अतिसार अशी लक्षणं आहेत. ही लक्षणं साधारणत: पॅकेटमधील अन्न किंवा पाणी प्यायल्यानंतर एका आठवड्यांनी दिसतात. ज्या सॅलडमुळे हा आजार पसरला ती उत्पादने इलिनॉयच्या स्ट्रीमवुडमधील फ्रेश एक्सप्रेस (Fresh Express) कंपनीने केली होती असा दावा केला जात आहे.
मे ते जुलै महिन्यात जवळपास १२ राज्यांमध्ये ही प्रकरणे नोंदवली गेली. हा आजार जॉर्जिया, आयोवा, इलिनॉय, कॅन्सस, मिनेसोटा, मिसुरी, नेब्रास्का, उत्तर डकोटा, पेनसिल्व्हेनिया, दक्षिण डकोटा आणि विस्कॉन्सिन येथिल लोकांना जास्त उद्भवला आहे. फेडरल अधिकारी लोकांना सल्ला देत आहेत की, लोकांनी हे सॅलेड खाऊ नये. कारण सध्या सॅलेड उत्पादनांचा शोध सुरू आहे. अन्नांद्वारे उद्भवलेल्या इतर आजारांप्रमाणे सायक्सोस्पोरामध्ये डीएनए-फिंगरप्रिंट तंत्रज्ञान नाही. ज्यामुळे याचे उत्पादन कोठे झाले, हे शोधता येऊ शकेल. सध्या एफडीए प्रत्येक पॅकेट सॅलड विकणाऱ्या दुकानांचा शोध घेऊन तपासणी करत आहे.
व्हिटामीन्समुळे कमी होत आहे 'या' देशातील कोरोना विषाणूंचे संक्रमण; तज्ज्ञांनी सांगितले मागचं कारण
भय इथले संपत नाही! देशात कोरोनापेक्षाही घातक आजाराचा शिरकाव; 'या' शहरात आढळला रुग्ण