केळी खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात हे तर सर्वांनाच माहीत आहे. केळी एक एनर्जी बूस्टर फळ आहे. याचा वापर अनेक प्रकारच्या डिश तयार करण्यातही केला जातो. पोटासाठी केळी फार फायदेशीर मानली जाते. केळीच्या एका तुकड्यात केवळ 90 कॅलरी असतात, केळी साखरेपासून तयार इतर पदार्थ खाण्यापेक्षा जास्त चांगली आहे. जर केळीच्या पोषक तत्वांबाबत सांगायचं तर प्रति 100 ग्रॅममध्ये 0.3 ग्रॅम कुल फॅट, शून्य कोलेस्ट्रॉल, 1 मिलीग्रॅम मीठ, 360 मिलीग्रॅम पोटॅशिअम, 2.6 ग्रॅम फायबर, 12 ग्रॅम शुगर आणि 1.1 ग्रॅम प्रोटीन असतं.
सामान्यपणे लोक केळी सोलून खातात आणि साल फेकून देतात. पण अनेकांना हे माहीत नाही की, केळी सालही खाता येऊ शकते. आणि यातूनही आरोग्याला फायदे होतात. अमेरिकन न्यूट्रिशनिस्ट एरिन केनी यांनी सांगितलं की, केळीची साल खाल्ली जाऊ शकते. केळीच्या सालीमध्ये पॉलिफेनोल्स, कॅरोटीनॉयड आणि इतर अॅंटी-ऑक्सीडेंट असतात. जे तुमच्या शरीरात कॅन्सर वाढवणाऱ्या मुक्त कणांसोबत लढतात.
आतड्यांसाठी फायदेशीर
एरिन केनी यांनी सांगितलं की, केळीच्या सालींमध्ये दोन प्रकारचे प्रीबायोटिक्स आणि रेसिस्टेंट स्टार्च असतात. जे आतड्यांमध्ये बॅड बॅक्टेरियाचं प्रमाण कमी करतात आणि गुड बॅक्टेरियाला वाढवण्यात मदत करतात.
फायबरचा मोठा स्त्रोत
एरिनने सांगितलं की, केळीच्या सालीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर तुम्ही केळी सालीसोबतच खावी. पण केळी पिकलेलीच खावी. कच्ची केळी सालीसोबत खाऊ नये.
अॅंटी-ऑक्सिडेंटचा भांडार
एरिन यांनी सांगितलं की, केळीच्या सालीमध्ये पॉलीफेनोल्स, कॅरोटीनॉयड आणि इतर अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात आढळतात. ही सगळी तत्वे शरीरासाठी फार फायदेशीर असतात.
कॅन्सरपासून होऊ शकतो बचाव
केळीचे जेवढे फायदे आहेत त्यापेक्षा जास्त याच्या सालीचे फायदे आहेत. जसे की, आधी सांगितलं केळीच्या सालींमध्ये भरपूर प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट असतात. हेच कारण आहे की, यांचं नियमितपणे सेवन केल्याने कॅन्सर तयार करणारे फ्री रॅडिकल्स नष्ट करण्यास याने मदत मिळते.