आईचे अमृततुल्य दूध बाळासाठी ठरू शकते घातक !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2016 3:02 PM
आईचे दूध जन्मानंतर बाळासाठी अमृततुल्य असते. बाळाच्या पोषणासाठी हे दूध अतिशय महत्त्वाचे असते. मात्र कीटकनाशकांच्या अतिरिक्त वापराने हेच दूध बाळासाठी घातक ठरू शकते, हे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
आईचे दूध जन्मानंतर बाळासाठी अमृततुल्य असते. बाळाच्या पोषणासाठी हे दूध अतिशय महत्त्वाचे असते. मात्र कीटकनाशकांच्या अतिरिक्त वापराने हेच दूध बाळासाठी घातक ठरू शकते, हे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. वेळीच कीटकनाशकांचा अतिरिक्त वापर कमी केला नाही तर येणाºया काळात आईचे दूध बाळासाठी लाभदायक न ठरता अनेक रोगांना निमंत्रण देणारे ठरेल.कीटकनाशके मानवी शरीरात मॅग्निफिकेशन पद्धतीने पसरतात. ही कीटकनाशके खाण्या-पिण्याच्या पदार्थांमार्फत शरीरात प्रवेश करतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. आरोग्य मंत्रालय व सिरसा येथील चौधरी देवी लाल विद्यापीठाच्या ऊर्जा व पर्यावरण विज्ञान विभागाद्वारे चालविल्या जाणाºया स्तनपान अभियानावर शंका व्यक्त करण्यात आली. संशोधक डॉ. रिंकी यांनी मानवी दुधात कीटकनाशकांच्या प्रमाणाविषयी केलेल्या संशोधनानुसार ज्या महिला आपल्या मुलांना स्तनपान करीत आहेत, त्या मुलांच्या शरीरात कीटकनाशके पोहचवत आहेत. असे प्रतिपादन केले आहे. या शोधानुसार, मानवी दुधात प्रति किलोग्रॅमला ०.१२ मिलीग्रॅम कीटकनाशके आढळतात. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या संशोधनाच्या तुलनेत हे प्रमाण शंभर पटींनी जास्त आहे. संशोधनासाठी डॉ. रिंकी यांनी जवळपास ४० महिलांच्या दुधाचे नमुने घेतले. यामध्ये ८ महिन्यांच्या ८० मुलांचा समावेश होता. तीन वर्षे केलेल्या या संशोधनाअंती दिसून आले की, आईच्या दुधात आढळणारे कीटकनाशक मुलाच्या शरीरात जाऊन १० पटीने वाढते.