मुंबई : अनेकदा ॲनिमिया म्हटले की महिलांकडे बोट दाखवले जाते; मात्र वास्तविक महिला-पुरुष दोन्ही घटकात ॲनिमियाचे प्रमाण वाढते आहे. बदललेली जीवनशैली आणि आहाराकडे होणारे दुर्लक्ष ही याची प्रमुख कारणे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे यावर प्रतिबंध करायचा असेल तर आहारात समतोल राखला पाहिजे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत सुमारे २५ हजार व्यक्तींच्या सीबीसी रक्त तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यात ६०-६५ टक्के महिला रुग्णांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता दिसून आली आहे.
ॲनिमिया म्हणजे काय?शरीरातील सगळ्या अवयवांना काम करण्यासाठी प्रत्येक पेशीला पुरवला जाणार ऑक्सिजन ज्या लाल रक्त पेशींमधून मिळतो, त्या लाल रक्त पेशींमधले हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे म्हणजे ॲनिमिया होय. ॲनिमिया हा आजार दुर्धर वाटत नसला तरी आपल्या शरीरातील प्रत्येक काम करणाऱ्या पेशीला ऑक्सिजनचे प्रमाण कमी मिळत आहे, ही बाब अतिशय गंभीर आहे. यावरून या आजाराची व्याप्ती लक्षात येते. यामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. म्हणजेच प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन पुरवणाऱ्या यंत्रणेत काहीतरी बिघाड आहे हे लक्षात येते.
ॲनिमियाची लक्षणे धडधड होणे, थकवा जाणवणे, गळून गेल्यासारखे वाटणे, भूक न लागणे, चिडचिडेपणा, केस लवकर पांढरे होणे, केस लवकर गळणे, जास्त वेळ एकाग्रतेने काम न करता येणे ही ॲनिमियाची लक्षणे आहेत. वरवर पाहता ही लक्षणे जीवघेणी वाटत नाहीत. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जाते; पण ही लक्षणे गंभीर वाटत नसली तरी दुसऱ्या एखाद्या आजाराची सुरुवात ठरू शकते.
पुरुषांनाही ॲनिमियाचा धोका१५-४९ वर्षे या वयोगटातील पुरुषांमधील प्रमाण
महिलांमध्ये प्रमाण अधिकस्त्रियांमध्ये ॲनिमिया असल्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा जवळपास तीन पटींनी जास्त आहे.
ज्यांना ज्यांना अशक्तपणा येतो त्या सगळ्यांनाच ॲनिमियाच असेल असे नाही. हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य असूनही थकवा का जाणवतोय हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांना भेट द्यावी. कारण कदाचित लोहाचे प्रमाण कमी असू शकते. ते कमी असल्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो. ॲनिमियाची विविध कारणे, परिणामांसह त्यावरील उपाय जाणून घेणेही महत्त्वाचे आहे.- डॉ. परिक्षित केणी, फिजिशिअन