४५ वर्षीय महिलेची एन्जीओप्लास्टी शस्त्रक्रिया : उल्हास पाटील रुग्णालयात उपचार
By admin | Published: February 02, 2016 12:16 AM
जळगाव : डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात येथील ४५ वर्षीय महिला रुग्णावर एन्जीओप्लास्टीची यशस्वी शस्त्रक्रिया हृदयरोग तज्ज्ञ डॉ.आर.बी. गुप्ता यांनी नुकतीच केली.
जळगाव : डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात येथील ४५ वर्षीय महिला रुग्णावर एन्जीओप्लास्टीची यशस्वी शस्त्रक्रिया हृदयरोग तज्ज्ञ डॉ.आर.बी. गुप्ता यांनी नुकतीच केली.जळगाव येथील ४५ वर्षीय महिला रुग्णाला अचानक छातीत दुखण्याचा त्रास सुरु झाला. त्यामुळे शहरातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या ठिकाणी एन्जीओग्राफीची तपासणी करण्यात आली. तपासणीत महिलेच्या हृदयाला रक्तपुरवठा करणारी धमणी १०० टक्के बंदावस्थेत असल्याचे निदान झाले. तज्ज्ञांनी या महिलेला बायपास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. ही जोखीम टाण्यासाठी महिला उपचारासाठी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात दाखल झाली. या ठिकाणी हृदयालयाचे प्रमुख डॉ.आर.बी.गुप्ता यांनी या महिलेच्या शस्त्रक्रियेचा निर्णय घेत यशस्वी शस्त्रक्रिया केली. या महिलेची प्रकृती आता उत्तम आहे. शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या कुटुंबियांनी डॉ.गुप्ता व सहकार्यांचे आभार मानले. अनुभव आणि प्रयत्नांच्या जोरावर १०० टक्के बंद असलेल्या धमन्या ६० टक्के शस्त्रक्रियांमध्ये उघडल्या जाऊ शकतात. त्यामुळे रुग्णाचे वय ४५ किंवा त्याहून कमी असल्यास बायपास शस्त्रक्रिया टाळून एन्जीओप्लास्टी यशस्वी करता येत असल्याचे डॉ.गुप्ता यांनी सांगितले.