डॉक्टर नेहमी सल्ला देतात की दररोज एक सफरचंद खाल्ल्यास आपण रोग आणि डॉक्टरांपासून दूर राहू शकतो. परंतु सफरचंद खाण्याचे फक्त फायदे आहेत किंवा यामुळे हानी देखील होऊ शकते. इंग्रजीत एक अतिशय प्रसिद्ध म्हण आहे, ‘अॅन अॅप्पल अ डे कीप्स डॉक्टर अवे’ म्हणजे रोज सफरचंद खाल्ल्यास डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. हे खरे आहे की सफरचंद अनेक रोगांवर उपाय आहे. पण सफरचंद खाण्याचे तोटेही आहेत....
सफरचंद खाणं हे आपल्या आरोग्यासाठी जरूर फायदेशीर असतं, परंतु त्याच्या अतिरिक्त सेवनामुळे आपल्या आरोग्याला त्याचा धोका होण्याची संभावना असते. त्यामुळे सफरचंद हे योग्य प्रमाणातच खायला हवं.
पचनसंस्थेवर दुष्परिणाम : सतत सफरचंद खाण्याची सवय ही आपल्या पचनसंस्थेवर परिणाम करू शकते. सफरचंदात मोठ्या प्रमाणात फायबरचं प्रमाण असल्यामुळे आपल्याला पोटाचा विकारही होण्याची शक्यता असते.
रक्तदाबाची समस्या : जास्त प्रमाणात सफरचंद खाल्याने आपल्याला रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे डायबिटीज असलेल्या लोकांसाठी अतिरिक्त प्रमाणात सफरचंद खाणं धोक्याचं ठरू शकतं.
लठ्ठपणाची समस्या : जर तुम्ही सतत सफरचंद खात असाल तर तुम्हाला लठ्ठपणाची समस्या निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. कारण त्यामध्ये कार्बोहायड्रेडचं प्रमाण जास्त असते. त्यामुळे लठ्ठपणाचा सामना करावा लागू शकतो.
दातांचे विकार : जास्त प्रमाणात सफरचंद खाल्ल्यामुळे आपले दात खराब होण्याची शक्यता जास्त असते. कारण सफरचंद हे अॅसिडिक असतं. त्यामुळे हे फळ योग्य प्रमाणातच खायला हवं.