नवी दिल्ली : कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट सी.१.२ ने जागतिक आरोग्य संघटनेची चिंता वाढवली आहे. डेल्टापेक्षा जास्त संक्रमण होत असलेल्या या व्हेरिएंटवर जागतिक आरोग्य संघटनेच्या टेक्निकल प्रमुख डॉ. मारिया वॉन यांनी ट्विट केले आहे की, कोरोनाच्या सी.१.२ व्हेरिएंटकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.
डॉ. मारिया वॉन म्हणाल्या की, जागतिक आरोग्य संघटना दक्षिण आफ्रिकेतील संशोधकांच्या सतत संपर्कात आहे आणि कोरोना साथीच्या काळात त्यांच्या संशोधनावर चर्चा करीत आहे. आम्ही दक्षिण आफ्रिकेतील संशोधकांचे आभार मानतो की, त्यांनी सर्वात आधी आरोग्य संघटनेला सी.१.२ बद्दल माहिती दिली आणि आपले संशोधन शेअर केले.
२१ मे रोजी दक्षिण आफ्रिकेत या व्हेरिएंटचे पहिले प्रकरण उघडकीस आल्यानंतर जगभरात आतापर्यंत या प्रकाराची १०० हून अधिक प्रकरणे उघडकीस आली आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या टेक्निकल प्रमुख डॉ. मारिया वॉन यांचे म्हणणे आहे की, या नवीन व्हेरिएंटच्या आणखी सीक्वेंसबाबत माहित असणे आवश्यक आहे. कारण, आतापर्यंत डेल्टा व्हेरिएंट सर्वात संसर्गजन्य असल्याचे दिसते.
नवीन व्हेरिएंट खूप धोकादायक असू शकतो शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, आतापर्यंत संपूर्ण जगाला डेल्टा व्हेरिएंटबाबत चिंता होती. मात्र, या नवीन व्हेरिएंटमुळे समस्यांमध्ये आणखी भर पडली आहे. या अभ्यासादरम्यान शास्त्रज्ञांना असेही आढळले आहे की, हा नवीन व्हेरिएटं शरीरातील लसीकरणाने बनलेल्या रोगप्रतिकारक शक्तीला सहज हरवू शकतो. पुन्हा एकदा सर्व लोकांसाठी कोरोनाचा धोका वाढत असल्याचे दिसून येत आहे.
व्हेरिएंट आपले वेगाने रुप बदलू शकतोकोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटला म्यूटेशनच्या बाबतीत शास्त्रज्ञ अत्यंत धोकादायक असल्याचे सांगत आहेत. २४ ऑगस्ट रोजी प्रीप्रिंट रिपॉझिटरी मेड्रेक्झिव्हवर पीअर-रिव्ह्यू स्टडीजसाठी पोस्ट केलेल्या डेटानुसार, कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंट सी १.२ मध्ये सी.१ पेक्षा वेगवान म्यूटेशन असू शकते. याचा अर्थ असा आहे की या नवीन कोरोना व्हेरिएंटचे स्पाईक प्रोटीन खूप वेगाने बदलू शकतात.