आरोग्य चांगलं राहण्यासाठी डॉक्टर लोकांना वेगवेगळी फळं खाण्याचा सल्ला देतात. कारण यात अॅंटी-बायोटिक आणि अनेक व्हिटॅमिन्स असतात. आता एका रिसर्चमधून असं समोर आलं आहे की, जास्तीत जास्त लाल रंगाच्या फळांमध्ये एक केमिकल असतं, जे तुम्हाला तरूण ठेवण्यास मदत करतं. याने तुम्हाला दीर्घायुष्य मिळू शकतं.
मिनेसोटा विश्वविद्यालयात इंस्टीट्यूट ऑफ द बायोलॉजी ऑफ एजिंग अॅन्ड मेटाबॉलिज्मचे सह-निर्देशक पॉल रॉबिन्स अनेक वर्षापासून यावर रिसर्च करत आहे. ते म्हणाले की, ज्या केमिकलमुळे स्ट्रॉबेरीचा रंग आणि टेस्ट खास असते, ते फायसेटिन केमिकल तुमचं वय वाढण्याचा एक घटक आहे. याला जोंबी सेल किलरही म्हणतात. म्हणजे एक असं केमिकल जे खराब सेल्स नष्ट करतं. डॉ. पॉल यांनी उंदरांवर अभ्यास केला आणि त्यांना आढळलं की, त्यांच्या वयात बराच फरक दिसून आला. त्यांच्या शरीरात व्यापक बदल बघायला मिळाला. ते म्हणाले की, हे केमिकल सफरचंद आणि खारीकसारख्या फळांमध्येही असतं.
स्वत:वरही केला प्रयोग
डॉ. पॉल यांनी कोरोना महामारी दरम्यान स्वत:वर प्रयोग केला. ते म्हणाले की, याने शरीरातील सूज कमी होते. सोबतच शरीरात तयार होणारे शक्तीशाली जोंबी सेल्स कमी होतात. ज्यामुळे तुमची इम्युनिटी वाढते. चेहऱ्यावर चमक येते. ते स्वत: फायसेटिनची खुराक आठवड्यातून दोन वेळा घेतात.
कोरोनापासून त्यांनी ही खुराक बंद केली नाही. यामुळे त्यांची त्वचा तरूण दिसू लागली. रॉबिन्स यांनी इनसायडरला सांगितलं की, माझे गुडघे खूप जास्त दुखत होते. उठण्या-बसण्यात समस्या होती. पण आता मला बरं वाटत आहे. मग हे सत्य नाही का की, याने बदल झाला आहे.
वैज्ञानिक फायसेटिनला सेनोलिटिक असंही म्हणतात. याने शरीरात खराब झालेल्या कोशिका नष्ट केल्या जातात. याने त्या वेगाने वाढू शकत नाहीत. जेव्हा या जोंबी कोशिकांचा नायनाट होतो तेव्हा हृदय, लिव्हर, फुप्फुसं आणि मेंदुसारखे मुख्य अवयवांची कार्यक्षमता सुधारते. कारण याने सूज कमी होते. तसेच वयामुळे होणारे आजारही जवळ येत नाहीत. रॉबिन्स म्हणाले की, जर तुम्ही 20, 30, किंवा 40 वर्षांचे असाल तर तुम्ही एक फिट व्यक्ती आहात. पण वय वाढताच वेगवेगळ्या समस्या सुरू होतात. तेव्हा या फळांची गरज पडते.