शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

'अ‍ॅन्टी ओबेसिटी' डे २०१९, जाणून घ्या लठ्ठपणाची कारणं आणि परीणाम 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 5:07 PM

आज २६ नोव्हेंबर  'अ‍ॅन्टी ओबेसिटी'  (Anti obesity) दिवस साजरा केला जातो. सर्व साधारणपणे भारतात लठ्ठपणाचे  रुग्ण जास्त आहेत.

(Image credit- Her zindgee)

आज २६ नोव्हेंबर  'अ‍ॅन्टी ओबेसिटी'  (Anti obesity) दिवस साजरा केला जातो. सर्व साधारणपणे भारतात लठ्ठपणाचे  रुग्ण जास्त आहेत.  हा दिवस साजरा करण्यामागचं कारण असं की,  भारतात झपाट्याने वाढणाऱ्या लठ्ठपणाचं प्रमाण कमी होण्यासाठी जागृती निर्माण करणे. आणि धोकादायक आजारांपासून सुटका करण्यासाठी प्रयत्न करणे. स्थूलता म्हणजेच शरीरात जास्त प्रमाणात चरबी साठणे होय. स्थूलता हा कायमस्वरुपी आजार म्हणजेच मोठ्या कालावधीसाठी शरीरात राहाणारा आजार मानला जातो. हा आजार लहान मुलांमध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. चला तर मग जाणून घेऊया लठ्ठपणाची कारणं आणि परिणाम.

 (Image credit- deccanchronicle)

लठ्ठपणाची कारणं  

१) बदलती जीवनशैली - बदलती जीवनशैली हेच स्थूलतेचे प्रमुख कारण आहे. जास्त खाणे आणि कमी श्रम हा चुकीचा मार्ग आहे. याउलट जास्त काम आणि कमी खाणे हे कुपोषणाचे कारण असते.

२) जंक फुडचे अधिक सेवन-  ब्रेड, बिस्कीट  यासारख्या मैद्याचे पदार्थ अति सेवन केल्यास शरीर वाढत जाते.  तसेच बाहेरचे तेलकट अन्नपदार्थ शरीरास अपायकारक ठरतात.

३) व्यायाम न करणे - बरेच लोक दैनंदिन जीवन जगत असताना शरीराची फारशी हालचाल करत नाहीत. त्यामुळे शरीरात चरबीचे प्रमाण वाढते. त्यामुळे लठ्ठपणा येतो. तसेच विविध आजारांचा सामना करावा लागतो. 

४) अनुवंशिकता - बरेचवेळा पालक लठ्ठ असले की मुलांमध्येही लठ्ठपणा येतो. स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा चरबीचे प्रमाण अधिक असते. स्त्रियांमधील हार्मोन्स् व स्थूलता यांचा जवळचा संबंध आहे. असे हार्मोन्स्  स्त्रियांमध्ये लठ्ठपणा वाढवितात. म्हणून ती नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. शारिरीक व मानसिक स्थैर्यातून ते सहज शक्य आहे.  स्त्रियां अन्न उरलेले असेल तर ते वाया जाऊ नये म्हणून संपविणे हा प्रकारदेखील होतो. यामुळे जास्त खाल्ले जाते. कौटुंबिक जबाबदारी व वेळेचा अभाव यामुळे व्यायाम किंवा खेळ या गोष्टींकडे विशेष दुर्लक्ष केले जातं. साहजिकच शारीरिक असंतुलन निर्माण व्हायला लागतं.

(Image credit-vydehi school of excellence)

लठ्ठपणा कमी करण्यासाठी उपा़य

१) आहारातील भाजीपाला,दूध, फळं, यांचे योग्य प्रमाणात सेवन करा.२) आहारात सर्वात जास्त फोकस ब्रेकफास्टवर करा. अनेकवेळा लोक वजन कमी करण्याचा नादात ब्रेकफास्ट करत नाहीत परंतु एका रिसर्चनुसार नियमितपणे ब्रेकफास्ट केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. ब्रेकफास्टमध्ये नेहमी वेगवेगळे पदार्थ असावेत.

३) पोटभर खाण्याऐवजी पोट थोडे रिकामे ठेवून उठावे.४) पिष्टमय पदार्थ आणि तेल-तूप आणि साखर यांचे प्रमाण कमी करावे.

(Image credit-Daily mail)

५) दररोज व्यायाम करावा. त्यामुळे शरीर लवचीक रा़हते.६)दररोज सकाळी एक ग्लास थंड पाण्यात दोन चमचे मध टाकून घेतल्यास शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स